"ख्रिश्चन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
संदर्भ यादी
खूणपताका: सुचालन साचे काढले दृश्य संपादन
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
{{ख्रिश्चन धर्म}}
{{बदल}}
'''ख्रिस्ती धर्म''' किंवा '''ख्रिश्चन धर्म''' हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. [[पॅलेस्टाईन]] (सध्याचा [[इस्रायल]] देश) येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. [[येशू ख्रिस्त]] हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या दरम्यान येशूचा जन्म बेंथलेहम गावी झाला.ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरापासून तुर्कस्तान पर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारा पर्यंत पसरले होते. पालेस्तीन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळ आली तेव्हा गालील प्रांतातील बेंथलेहम या गावी येशूचा जन्म झाला. त्या वेळी पालेस्तीन देशावर रोमन सत्ता अधिकार गाजवीत होती. सम्राट ऑगस्टस हा या साम्राज्याचा सम्राट होता. त्याने गालील प्रांताचा मांडलिक राजा म्हणून हेरोद राजाला नेमले होते. याच्याच अमदानीत येशूचा जन्म झाला.
येशू (मूळ हिब्रू शब्द यहोशवा - यहोवा माझे तारण आहे.) या हिब्रू नावाचा अर्थ तारणारा असा आहे. तर ख्रिस्त हा शब्द ख्रिस्तोस या ग्रीक शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ अभिषिक्त केलेला असा होतो. ख्रिस्तोस हा शब्द मसीहा (म्हणजे तारणारा) या हिब्रू शब्दाचे ग्रीक भाषेतील रूपांतर आहे. येशू धर्माने यहुदी होता. वयाच्या ३०व्या वर्षी त्याने आपल्या शिकवणुकीला प्रारंभ केला. जवळपास तीन वर्ष त्याने आपली शिकवण संपूर्ण गालील प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात प्रसारित केली. त्याने बारा प्रेषितांची निवड करून त्यांना आपले कार्य पुढे चालविण्यास प्रोत्साहन दिले. [[यहुदी]] धर्मानुसार (जुना करार) पापी मानवाच्या तारणासाठी परमेश्वराने तारणारा (मूळ हिब्रू शब्द मसीहा) पाठविण्याचे अभिवचन दिले होते. जुन्या करारात या मसीहाबद्दल अनेक भविष्ये वर्तविली गेली होती. येशू हाच तारणारा (मसीहा) आहे अशी ख्रिस्ताच्या शिष्यांची खात्री झाली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी यहुदी धर्माधिकाऱ्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप करून तत्कालीन रोमन सत्ताधीशांच्या करवी त्याला क्रुसावर खिळवून ठार केले. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याने आपल्या अनेक प्रेषितांना दर्शने दिली. व त्याची शिकवण जगभर प्रसारित करण्याची आज्ञा दिली. त्यांनंतर तो स्वर्गात गेला. असा ख्रिस्ती धर्मीयांचा विश्वास आहे. त्याच्या आज्ञेनुसार त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार केला. [[बायबल]] (जुना व नवा करार) हा ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा धार्मिक समुदाय आहे. ख्रिस्ती धर्मात तीन मुख्य पंथ आहेत. १. कॅथोलिक, २ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, ३. प्रोटेस्टंट . या पंथांतही (विशेषतः प्रोटेस्टंट पंथात) [[प्रेस्बिटेरियन]], कॅल्व्हिनिस्ट आदी अनेक उपपंथ आढळतात. {{संदर्भ हवा}}
Line २० ⟶ २१:
* रेस्टोरेशनिझम आणि नाॅन ट्रिनिटेरियानिझम
 
== संदर्भ ==
[[:en:List of Christian denominations by number of members|पंथ-उपपंथ]]
 
ओळ २६:
ख्रिस्ती लोकांचा असा विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे, तो ईश्वर असून मनुष्य झाला, मानवतेचा रक्षक, जो तारणारा, त्यामुळे ख्रिस्ती लोक येशूला [[ख्रिस्त]] किंवा मसीहा म्हणतात.
 
ज्याची हिब्रू बायबल (यहुदी लोकांचे धर्मपुस्तक व ख्रिस्ती लोकांचे जुना करार)मध्ये भविष्यवाणी केली होती तोच हा येशू मसीहा आहे असा ख्रिस्ती लोकांचा विश्वास आहे.<ref>{{संदर्भसंकेतस्थळ हवास्रोत|दुवा=http://hindi.webdunia.com/other-religion/judaism-108123100008_1.html|शीर्षक=यहूदी धर्म को जानें {{!}} yahudi religion|last=जोशी 'शतायु'|पहिले नाव=अनिरुद्ध|संकेतस्थळ=hindi.webdunia.com|भाषा=hi|अॅक्सेसदिनांक=2019-09-05}}</ref>
 
== भारतातील ख्रिश्चन ==
[[चित्र:Nasrani cross.jpg|thumb|Nasraniनसरानी cross]]
२०११ च्या जनगणनेनुसार भारतात ख्रिश्चन धर्म हा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. ख्रिस्तीधर्मीय भारताच्या लोकसंख्येच्या २.३ टक्के आहेत. भारतात या धर्माचे आगमन [[संत थॉमस]] याच्या येण्यानंतर झाले. भारताच्या ४ राज्यांत ख्रिश्चन हे बहुसंख्याक आहेत.<ref>{{संदर्भजर्नल हवास्रोत|date=2019-05-21|title=भारत में धर्म|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE&oldid=4195955|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
{{बदल}}
इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू या तिन्ही धर्माचा भारतीय उपखंडातील प्रवेश दक्षिण भारतातील केरळ प्रांतातून झाला. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रत्यक्ष शिष्यांपकी सेंट थॉमस ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने केरळच्या किनारपट्टीवरील मुझिरिस म्हणजे सध्याचे कोडुंगलूर येथे इ.स. ५२ मध्ये आला. त्याच्या तिथे येण्यापूर्वी काही ज्यू लोक आधीच त्या भागात स्थायिक झाले होते. थॉमसने त्या भागातील पालायार, कोडुंगलूरवगरे आठ ठिकाणी चच्रेस स्थापन करून ख्रिस्ती धर्मप्रसाराची केंद्रे सुरू केली. इ.स. ७२ मध्ये चेन्नईजवळच्या सध्याच्या सेंट थॉमस माऊंट येथे त्याची हत्या झाली.
 
सेंट थॉमसने ख्रिस्ती धर्माची दीक्षा (बाप्तिस्मा) दिलेल्या लोकांची संख्या वाढत गेली. सेंट थॉमस हा सीरियन ख्रिस्ती धर्मपीठाचा धर्मोपदेशक असल्यामुळे त्याने दीक्षा दिलेल्या ख्रिस्ती धर्मीयांना ‘सीरियन ख्रिश्चन्स’, ‘सेंट थॉमस ख्रिश्चन्स’ किंवा ‘नसरानी ख्रिश्चन्स’ असे संबोधण्यात येते. सीरियन ख्रिश्चन पंथीयांची संख्या अधिकतर केरळातच आढळते. सीरियन ख्रिश्चन धर्मपंथाचे हे भारतातले ख्रिश्चन या परकीय धर्माचे पहिले अनुयायी.  पुढे मध्यपूर्वेतल्या आणि आफ्रिकन देशांमधून आलेले ख्रिश्चन लोक आणि धर्मातर केलेले ज्यू धर्मीय यांनीही सीरियन धर्मपंथाचा स्वीकार केला. केरळातल्या या सीरियन ख्रिस्ती लोकांचे वैशिष्टय़ म्हणजे यांच्या जीवनशैलीवर तिथल्या स्थानिक हिंदू परंपरांचा पडलेला प्रभाव हे आहे. हिंदूंच्या काही स्थानिक परंपरा पाळणाऱ्या या सीरियन ख्रिश्चनांचे सर्व व्यवहार मल्याळी भाषेतच चालतात. धर्मग्रंथही मल्याळी भाषेत अनुवादित केलेले येथे वाचले जातात. या समाजातील अनेक लोकांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने समाजाचे नाव मोठे केले आहे. भूतपूर्व केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी, भारतातील उच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधीश अ‍ॅना चांदी, प्रसिद्ध मल्याळी कवी के.व्ही.सायमन, ख्रिस्ती धर्मोपदेशक साधू कोचुंजु उपदेशी हे सर्व सीरियन ख्रिश्चन होत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/navneet-news/christianity-religion-in-india-1622192/|शीर्षक=भारतातील ख्रिस्ती धर्मप्रसार|दिनांक=2018-01-26|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-09-05}}</ref>
 
<br />
 
== संदर्भ यादी ==
<references />
[[वर्ग:धर्म]]
[[वर्ग:ख्रिश्चन धर्म| ]]