"अतिसार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३१:
निदान पद्धतीमध्ये परजीवी शोधण्यासाठी आणि वृद्धि मिश्रणामध्ये जंतुसंसर्गाची शौच तपासणी करावी लागते. ब-याच रुग्णामध्ये ही चाचणी नकारात्मक येते. अतिसाराचे नेमके कारण कळत नाही. अतिसार झाल्याची लक्षणे सुरू झाल्यावर त्वरित या तपासण्या केल्या तरच नेमके कशामुळे अतिसार झाला आहे याचे निदान करता येते. दोन महिन्याहून अधिक काळ प्रतिजैविके घेणा-या रुग्णामध्ये प्रतिजैविक संबंधी विषारी द्रव्ये आणि बृहहदांत्रशोथ – कोलायटिस असल्यास खात्री करून घ्यावी लागते. शौचामधून रक्त पडत असल्याचे निदान सूक्ष्मदर्शक तपासणीमधून करता येते. शौचामधून रक्त पडणे आतड्याचा तीव्र दाह होत असल्याचे लक्षण आहे. आतड्याची दुर्बीणीतून तपासणी केल्यास आतड्याचा दाह किती तीव्र आहे हे ठरवता येते. रक्त तपासण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि रक्तपेशींचे प्रमाण मोजणे आवश्यक असते.
दीर्घकालीन अतिसार याहून अगदी वेगळा असतो. बहुतेक रुग्ण एवढ्या दिवसात आपली तपासणी करवून घेतात. दीर्घकालीन अतिसाराचे प्रमुख कारण परजीवी आतड्यामध्ये असणे . काळजीपूर्वक घेतलेल्या रुग्णाच्या माहितीमध्ये आधी घेतलेली औषधे, आहारातील बदल, कौटुंबिक इतिहास, आणि इतर लक्षणांचा समावेश होतो. 4.5 किलो घटलेले वजन, शौचावाटे रक्त पडणे आणि रात्री शौचासाठी झोपल्यानंतर उठावे लागणे हे काळजी करण्यासारखी स्थिति दर्शवतात.
डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे, आणि केमिस्टकडे मिळणारी औषधामध्ये असलेले लॅक्टोज आणि सॉरबिटॉल सारख्या घटकानाघटकांना काही व्यक्ती संवेदनशील असतात. अशा संवेदनशील व्यक्तीनाव्यक्तींना अशा घटकामुळे अतिसार होऊ शकतो. अधिहर्षता किंवा त्वचेमध्ये होणारा बदल हे आणखी एक कारण. कधी कधी ताण असल्यास अतिसार होण्याची शक्यता असते. परीक्षेच्या काळात किंवा पळण्याच्या शर्यती आधी ताणामुळे शौचास सारखे जावे लागणे हे ताणाचे लक्षण आहे.
शौच, रक्त आणि मूत्र तपासणी दीर्घकालीन अतिसाराच्या नेमक्या निदानासाठी करणे आवश्यक आहे. दुर्बीणीतून आतड्याची तपासणी आणि क्ष किरण चिकित्सा वारंवार केल्यानंतर योग्य ते निदान करता येते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अतिसार" पासून हुडकले