"गुरुत्वाकर्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(→‎न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
छो
खूणपताका: दृश्य संपादन अनावश्यक nowiki टॅग
गुरुत्वाकर्षण हे [[विद्युतचुंबकत्व]] आणि नाभिकीय दृढ अंतर्प्रभाव व अदृढ अंतर्प्रभाव ह्या तिघांसोबत प्रकृतीतील चार मूलभूत अंतःप्रभावांमधील एक आहे. गुरुत्वाकर्षणाला गणितीय सूत्रात बसवण्यात प्रथम [[आयझॅक न्यूटन]] यशस्वी ठरला. त्याने [[न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम]] मांडला. गुरुत्वाकर्षणाच्या न्यूटनच्या नियमांची जागा आता [[अल्बर्ट आइनस्टाइन|अल्बर्ट आइनस्टाइनच्या]] [[साधारण सापेक्षता सिद्धान्त|साधारण सापेक्षता सिद्धान्ताने]] घेतली आहे. न्यूटनचे नियम प्रकाशापेक्षा फार कमी वेग असणाऱ्या वस्तूंसाठी पुरेसे अचूक आहेत. यासाठी ते नियम अजूनही बहुतेक जागी लागू होतात.
 
विश्वनिर्मितीच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर गुरुत्वाकर्षणामुळे पसरलेले [[पदार्थ]] संगठित होऊन अखंड राहतात. त्यामुळेच [[ग्रह]], [[तारा|तारे]] व दीर्घिकांसारख्या स्थूल वस्तू बनतात. पृथ्वी व इतर ग्रहांच्या सूर्याभोवती, चंद्राची पृथ्वीभोवती अश्या कक्षासुद्धा गुरुत्वाकर्षणामुळेच कायम असतात. संवहन व भरती-ओहोटी अशा पृथ्वीवर पाहिल्या जाणाऱ्या घटनांपासून ते तारकांच्या आंतरिक भागांमधील उष्णतेसारख्या घटनांपर्यंत भरपूर गोष्टींमध्ये गुरुत्वाकर्षणाचा वाटा आहे.
 
== गुरुत्वाकर्षणाच्या संकल्पनेचा इतिहास आणि वाटचाल ==
=== पुरातन संकल्पना ===
==== अ‍ॅरिस्टॉटल ====
अ‍ॅरिस्टॉटलची[[अॅरिस्टॉटल|अ‍ॅरिस्टॉटल]]<nowiki/>ची अशी कल्पना होती की जड वस्तू हलक्या वस्तूंपेक्षा अधिक वेगाने खाली पडतात. त्याच्या मतानुसार पृथ्वीचे केंद्र (जे विश्वाचेही केंद्र मानले जात होते) ते जड वस्तूंना आकर्षित करते. जेवढी वस्तू जड, तेवढे जास्त आकर्षण असते. ही कल्पना पुढे चुकीची असल्याचे सिद्ध झाले.
 
==== टॉलेमी ====
 
====ब्रह्मगुप्त====
७व्या शतकामधील भारतीय गणितज्ञ व [[खगोलशास्त्रज्ञ]] ब्रह्मगुप्त ह्याच्या मते पृथ्वी गोलाकार होती. हा दृष्टिकोन तत्कालीन पृथ्वी सपाट अथवा पोकळ असल्याच्या पौराणिक दृष्टिकोनाच्या विपरीत होता. ब्रह्मगुप्ताने सांगितल्या प्रमाणे :
<blockquote><p>"परंतु तसे [पृथ्वी गोल] नसल्यास पृथ्वी स्वर्गाच्या व वेळेच्या प्रणांशी एकविध व समान गती ठेवण्यास असफल राहील. [...] '''सर्व भारी वस्तू पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात.''' [...] पृथ्वी सर्व बाजूने समान आहे; पृथ्वीवर सगळे जण सरळ उभे राहतात, आणि प्रकृतीच्या नियमानुसार सगळ्या भारी वस्तू पृथ्वीकडे खाली पडतात, कारण '''वस्तूंना आकर्षित करणे व जवळ ठेवणे ही पृथ्वीची प्रवृत्ती आहे''', जशी पाण्याची वाहण्याची, अग्नीची जळण्याची व वाऱ्याची वाहण्याची प्रवृत्ती आहे. [...] पृथ्वी ही एकमेव खालची वस्तू आहे व वस्तू नेहमी तिच्याकडे परत येतात; तुम्ही त्यांना कोणत्याही दिशेत फेका, त्या कधी पृथ्वीपासून वरती जात नाहीत."<ref>ब्रह्मगुप्त, ब्रह्मस्फुटसिद्धान्त (६२८)</ref> </p>
</blockquote>
३१९

संपादने