"दुसरे बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मराठी राज्‍य कसे बुडाले याविषयी रियासतकार सरदेसाई यांनी केलेली चर्चा.
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन nowiki ?
ऐतिहाि‍सिक विषयांचे संदर्भ तसेच संपादन करणा-या सदस्‍याने स्‍वतः पाहिलेल्‍या ऐतिहासिक गोष्‍टींविषयी उल्‍लेख.
ओळ ३२:
मराठ्यांच्‍या सत्तेचा अस्‍त का झाला याविषयी रियासतकार सरदेसाईंनी विस्‍तृत विवेचन केले आहे, ते पुढीलप्रमाणे -
 
<nowiki>''</nowiki>एक पक्ष म्‍हणतो की इंग्रजांकडे उत्तम प्रतीची शस्‍त्रास्‍त्रे व कवायती युद्धपद्धती असल्‍यामुळे इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. तर दुसरा पक्ष म्‍हणतो की इंग्रजांमध्‍ये एकता असल्‍याने इंग्रजांनी मराठ्यांवर विजय मिळविला. मात्र तसे पाहू गेले तर महादजी शिंद्यांनी (सिंदिया) अलिगढ येथे फ्रेंचांच्‍या मदतीने अत्‍याधुनिक शस्‍त्रांचा कारखाना काढला होता. तसेच फ्रेंच सेनापतींच्‍या मदतीने कवायती फौज देखील उभी केली होती. मात्र मराठ्यांच्‍या पक्षामध्‍ये सर्वांना सावरुन घेणारा, सांभाळून घेणारा, पुढे नेणारा कोणी नेता नव्‍हता त्‍यामुळे मराठ्यांच्‍या पक्षाचा पराभव झाला. यावेळी इंग्रजांकडे एकाहून एक धुरंधर सेनानी, मुत्‍सद्दी व राजकारणी होते ते सर्व एकत्र विचार करून चर्चा करून राजकारणाचे धोरण काय ठरवावयाचे याचा निर्णय घेत.

(मुंबईच्‍या फोर्ट विभागातील रॉयल एशियाटिक सोसायटीच्‍या इमारतीमध्‍ये (इमारतीचे बांधकाम वर्ष अंदाजे इ.स. १८०४), मोठी लोखंडी (आगप्रतिबंधक) तिजोरी आहे. त्‍या तिजोरीमध्‍ये ठेवलेले कागदपत्र आगीमध्‍ये जळणार नाहीत. मुंबईमधील एका पारशी कंपनीने ही तिजोरी तयार केलेली आहे. ही तिजोरी प्रदर्शनार्थ ठेवली आहे. चार माणसांना देखील ही तिजोरी उचलता येणार नाही एवढी ती जड आहे. या तिजोरीमध्‍ये पुना दरबार, ग्‍वालियर दरबार, बडोदा दरबार, नागपूर दरबार अशी लेबल लावलेले छोटे छोटे ड्रॉव्‍हर आहेत. बहुधा या ड्रॉव्‍हरमध्‍ये या ठिकाणच्‍या इंगज वकिलांनी (रेसिडेन्‍ट) पाठविलेली माहिती ठेवली जात असावी व त्‍याचा एकत्रित विचार करून पुढील राजकारण ठरविले जात असावे. मराठी रियासतमध्‍ये असा उल्‍लेख आहे की, सर्व ठिकाणच्‍या दरबारांतील इंग्रजांचे रेसिडन्‍ट आपल्‍याला समजलेली स्‍थानिक माहिती चार पाच प्रतींमध्‍ये तयार करून मुंबई, कलकत्ता, मद्रास तसेच इतर सहकारी रेसिडन्‍टना पाठवीत असत.)

हे सर्व इंग्लिश लोक अनेक वर्ष राजकारणात, सैनिकी सेवेत अनुभव मिळविलेले होते. इंग्रजांकडे एका फळीतील मुत्‍सद्दी निवृत्त झाल्‍यावर त्‍याची जागा पुढे चालविण्‍यासाठी यथायोग्‍य उमेदवार निवडून त्‍याला पारंगत करण्‍यासाठी विशेष प्रयत्‍न केले जात. याउलट मराठ्यांच्‍या पक्षाकडे असे काही धोरण नव्‍हते. केवळ वंशपरंपरा चाललेल्‍या सरदारक्‍या व दरबारी पदे अयोग्‍य व्‍यक्‍तींच्‍या हातात आली. खरेतर राष्‍ट्रहिताला प्राध्‍यान्‍य देऊन, सवाई माधवरावाच्‍या आत्‍महत्‍येनंतर सर्व सरदारांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून राष्‍ट्राच्‍या प्रगतीची दिशा ठरवावयास पाहिजे होती. मात्र आपसातील फाटाफुटीमुळे हे सर्व झाले नाही.
 
<ref name=":0" />शिवकालात जसे चारित्र्यसंवर्धन झाले व सर्वसामान्‍य माणसाचा देखील राष्‍ट्रनिर्मितीच्‍या कार्यात उपयोग झाला ते चारित्र्य अगदीच रसातळास गेले. प्रमुख राजकारणी मंडळी देखील यातून सुटली नाहीत. वाणीची सत्‍यता राहिली नाही. शब्‍दावर विश्वास राहिला नाही. थोडक्‍यात म्‍हणजे राज्‍य चालविण्‍याइतकी तपश्‍चर्या राजकारणी लोकांची राहिली नाही व स्‍वातंत्र्य उपभोगण्‍याची योग्‍यता सर्वसामान्‍यांची राहिली नाही तेव्‍हा स्‍वातंत्र्य गेले.<nowiki>''</nowiki>
Line ३९ ⟶ ४३:
ना. सं. इनामदार;"झेप",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६३<br>
ना. सं. इनामदार;"मंत्रावेगळा",कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९६९
 
"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युुलर प्रकाशन
 
==अधिक माहिती==
ना. सं. इनामदार यांनी " मंत्रावेगळा " या कादंबरीतून श्रीमंत दुसरे बाजीराव पेशवे यांच्या स्वभावातील तसेच त्यांनी केलेल्या राजकारणातील बारकावे सांगत पेशवाईचा अखेरचा काळ (सन १८१५ ते १८१८) आपल्या डोळ्यांसमोर उभा केला आहे.
 
"मराठी रियासत भाग ८" - रियासतकार सरदेसाई - पॉप्‍युलर प्रकाशन - शहाजी महाराजांपासून दुसरे बाजीराव पेशवे यांच्‍यापर्यंतच्‍या प्रदीर्घ कालखंडाचा तारखांप्रमाणे (ऐतिहासिक कागदपत्रांच्‍या आधारे लिहिलेला) इतिहास. रियासतकार सरदेसाई हे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्‍या सेवेत होते. त्‍यावेळी सयाजीरावांबरोबर त्‍यांना अनेक वेळा परदेशी जाण्‍याची संधी मिळाली तसेच सयाजीरावांच्‍या विश्वासातील असल्‍यामुळे मुंबईच्‍या इंग्रज दप्‍तराचे मुक्‍तपणे अवलोकन करता आले व इतिहासाची मूळ साधने पडताळून पाहता आली. अशा ठोस आधारावर मराठी रियासतचा चिरेबंदी वाडा उभा राहिला आहे.
{{पेशवे}}
{{मराठा साम्राज्य}}