"धुंडिराज गोविंद फाळके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
ओळ ४०:
 
छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास रामराम ठोकला. पुढे "लाईफ ऑफ ख्रिस्त" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या (चित्रपट, English:Motion Pictures) व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला जो ३ मे १९१३ साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात (Coronation Cinema) प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखवण्यात आला.
 
==सरस्वतीबाई धुंडिराज फाळके==
या दादासाहेब फाळके यांच्या पत्नी. दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात यांचा मोलाचा सहभाग होता. चित्रपटाच्या निर्मितीखर्चासाठी सरस्वतीबाईंनी आपले सोन्याचे दागिने विकले. त्या फिल्म डेव्हलपिंग, मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग शिकल्या. त्या फिल्मचे परफोरेटिंग (फिल्मवर दोन्ही कडांना भोके पाडणे), एडिटिंग (फिल्मचे तुकडे जोडणे) करीत. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पॅट बाॅय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामे करीत. त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, आरामाची सोय करणे, आणि त्यावरही ६०-७० लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धुवीत.
 
रात्री सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेनस्टाॅर्मिंग (अडचणी दूर करण्यासाठी गटचर्चा करणे) करीत.
 
सरस्वतीबाईं फाळके यांना राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटासाठी तारामतीची भूमिका करण्यासाठी विचारले होते. पण मग कामांचे काय या विचाराने त्यांनी नकार सांगितला.
 
सरस्वतीबाईंनी जर मदत केली नसती तर भारतातला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते.
 
सरस्वतीबाई फाळके यांच्या नावाचा एक पुरस्कारही आहे.
 
== कारकीर्द ==