"नरहरी सोनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
नरहरी सोनारांचे अभंग**
**१ देवा तुझा मी सोनार |I तुझे नामाचा व्यवहार |I
देह बागेसरी जाणे |I अंतरात्मा नामसोने |I
त्रिगुणाची करून मूस |I आत ओतिला ब्रम्हरस |I
जीव शिव करुनी फुंकी |I रात्रन्‌दिवस ठोकाठाकी |I
विवेक हातवडा घेऊन |I कामक्रोध केला चूर्ण |I
मन बुद्धीची कातरी | I रामनाम सोने चोरी |I
ज्ञान ताजवा घेऊन हाती |I दोन्ही अक्षरे जोखिती |I
खांद्या वाहोनी पोतडी |I उतरला पेंल थंडी |I
नरहरी सोनार हरीचा दास |I भजन करा रात्रन्‌दिवस |I
 
**२ काय तुझी थोरी वर्णू मी पामर |I
होसी दयाकर कृपानिधी ||
तुझ सरशी दया नाही आणिकासी |I
असे हृषीकेशी नवल एक |I
जन हो जोडी करा नाम कंठी धरा |I
जणे चुके फेरा गर्भवासी || I
नरदेही साधन समता भवभक्ती |I
निजध्यास चित्ती संतसेवा ||
गरुपदी निश्चळ परब्रह्म पाहे |I
नरहरी राहे एक चित्ते |I
 
**३ पापांचे पर्वत मोठे मोठे झाले I
शरीर नासले अधोगती ||
जन्मांतरी केले अवघे व्यर्थ गेले |I
देह नासले हो क्षणामाजी ||
जिणे अशाश्वत देह नाशवंत |I
अवघे सारे व्यर्थ असे देखा ||
काही नाही दान काही नाही पुण्य |I
जन्मासी येऊनी व्यर्थ जाय ||
परोपकार काहीनाही केला देवा |I
सद्गुरु केशवा ह्रदयी घ्यावा ||
सारामध्ये सार नाम असे थोर |I
ह्रदयी निरंतर नरहरीच्या ||