"बानू कोयाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५६:
''डॉ.'' '''बानू कोयाजी''' (जन्म : मुंबई, ७ सप्टेंबर १९१७; मृत्यू : पुणे, १५ जुलै २००४) ह्या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक डॉक्टर व समाजसेविका होत्या.
 
बानू कोयाजी यांचे वडील पेस्तनजी कापडिया स्वतः एम.डी. होते. बानूबाईंनीही १९४६ मध्ये मुंबईतील प्रसिद्ध ग्रॅॅंटग्रॅँट मेडिकल कॉलेज मधून एम.डी. झाल्या. त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून काम केले. बानूबाई स्त्रीरोग आणि प्रसुतिशास्त्राच्या तज्ज्ञ होत्या. अध्यापनापेक्षा प्रत्यक्ष रुग्णसेवेत त्यांना जास्त रस होता.
 
बानू कोयाजी यांचे लग्न जहांगीर कोयाजी यांच्याशी झाले. त्यांचे मोठे दीर डॉ. एडलजी कोयाजी हे गरिबांसाठी अतिशय आस्थेने, मनापासून काम करीत. त्यांचे काम बघूनच वैद्यकीय ज्ञान केवळ पैसा मिळविण्याचे साधन नसून त्यातून समाजसेवा करणेही महत्त्वाचे आहे. याची बानूबाईंना जाणीव झाली. आपल्या समाजात स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रश्न आहेत. भारतीय समाजाला स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतितज्ज्ञांची गरज आहे, हे जाणून व बानूबाईंच्या दिरांच्या सूचनेला मान देऊन त्यांनी आपल्या ज्ञानाची व कार्याची दिशा निवडली. प्रथम सहा महिन्यांसाठी बानूबाई के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये आल्या आणि कायमच्या के.ई.एम.च्या बनल्या. के.ई.एम. त्यांचे झाले. पुण्यातील के.ई.एम. म्हणजे डॉ.बानू कोयाजी असे समीकरणच तयार झाले. सुरुवातीला केवळ ४० खाटा असणारे के.ई.एम. हॉस्पिटल डॉ.बानूबाईंनी टप्प्याटप्प्याने वाढवीत नेले.{{तारीख}}