"थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ५९:
असा "गजांतमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाहि. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावातापुढे मोगल हैराण झाले.
 
छत्रसालाने झाशी प्रांत (२॥ लक्षांचा) पेशव्यांस दिला व पुढे आपल्या राज्याचा तिसरा हिस्साहि त्यांस दिला (१७३३).इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्‍नींपैकी एकीची मुलगी "[[मस्तानी]]" बाजीरावास दिली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/10821-2013-03-06-03-05-55|शीर्षक=बाजीराव बल्लाळ पेशवे|संकेतस्थळ=ketkardnyankosh.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-12-23}}</ref> बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळावेत असा या मागचा हेतू असावा.. या शिवाय बाजीरावास "[[काशीबाई]]" ही प्रथम पत्‍नी होतीच. मस्तानीकडून समशेरबहाद्दर ऊर्फ कृष्णराव असे एकूण ४ पुत्र झाले. कर्मठ ब्राह्मणांनी [[मस्तानी]] [[मुसलमान]] असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.
 
[[चिमाजी अप्पा]] हा बाजीरावाचा धाकटा भाऊ. याने देखील कोकण किनार्‍यावर मराठी सत्तेचा भगवा फडकवत ठेवला. बाजीरावाला शोभेल असाच त्याचा हा धाकटा भाऊ होता. बाजीरावाने दिल्लीस आणि चिमाजीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. या लढाईत चिमाजीने पोर्तुगीजांकडून ७ शहरे, ४ बंदरे, २ लढाऊ टेकड्या आणि ३४० गावे जिंकून घेतल्याचा उल्लेख मिळतो. [[वसईची लढाई]] ही चिमाजीला कीर्तीच्या अत्युच्च शिखरावर घेऊन गेली. त्याची जाणीव ठेवून चिमाजीने वसईजवळच "वज्रेश्वरी" देवीचे सुंदर मंदिर बांधले.
ओळ ७८:
'''<nowiki/>'''
=वैयक्तिक आयुष्य=
यांचे लग्न १७१३ सालच्या सुमारास चासकर महादजी कृष्ण जोशी यांची मुलगी काशीबाई हिच्याशी झाले.काशीबाईपासून बाजीरावास रामचंद्र ऊर्फ [[रघुनाथराव पेशवा]], जनार्दन व बाळाजी ऊर्फ [[नाना पेशवा|नानासाहेब पेशवा]] असे ३ पुत्र होते.काशीबाईंंचा मृत्यू १७५८साली झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-44-50/10821-2013-03-06-03-05-55|शीर्षक=बाजीराव बल्लाळ पेशवे|संकेतस्थळ=ketkardnyankosh.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2018-12-24}}</ref> छत्रसाल प्रकरणाच्या वेळी मस्तानीशी विवाह झाला(१७२९). मस्तानीपासून कृष्णराव उर्फ समशेरबहाद्दर हा पुत्र झाला.
 
वर काशीबाई व मस्तानीबाई यांचे अत्यंत उत्कट प्रेम होते. पण रूपवान बाजीरावावर हिंदुस्थानातील अनेक स्त्रिया भाळल्या होत्या. एकदा तर बलाढ्य निजामाच्या जनानखान्याने बाजीरावांना पाहण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा निजाम हादरला. त्याने जनानखान्यास धमकावलेही. परंतु स्त्रियांच्या अट्टहासामुळे निजामाने बाजीरावांना दरबारात बोलावले तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून तमाम जनानखाना संमोहित झाला. कित्येक महिलांनी त्यांच्यावर पायली पायली मोती उधळले. महालात मोत्यांची रास उभी राहिली, परंतु बाजीरावांच्या पापण्या झुकलेल्या होत्या. तिथे बाजीराव उद्‍गारले एक काशीबाई, दुसरी मस्तानीबाई या दोघी माझ्या पत्‍नी बाकी सर्व स्त्रिया मला मायबहिणी.