"ड-जीवनसत्त्व" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३४:
आपल्या त्वचेमध्ये बीटा (''β)'' डीहायड्रोकोलेस्टेरोल हा एक घटक असतो. सूर्यप्रकाशातील अतिनील किरण त्वचेवर पडल्यास त्याचे रूपांतर काॅलिकॅल्सिफेरॉल म्हणजेच ड जीवनसत्त्वामध्ये होते. त्यामुळे सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी ड जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळवण्याचा सूर्यप्रकाश हा एक चांगला आणि बिनखर्चाचा मार्ग आहे. मात्र असे जीवनसत्त्व पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी योग्य प्रखरतेचा सूर्यप्रकाश योग्य तितका वेळ मिळणे आवश्यक असते.
 
अतिनील किरणांचे (Ultra Violet) तरंग लांबीनुसार अ, ब आणि क असे वर्गीकरण केले जाते. त्यापैकी ब प्रकारचे किरण (UVB) ज्यांची तरंगलांबी २९० ते ३२० नॅनोमीटर असते तेच फक्त ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी तरंगलांबी असलेले अ आणि क प्रकारचे किरण त्यासाठी निरुपयोगी ठरतात. सकाळी ११ ते दुपारी १ ह्या वेळेत ब प्रकारच्या किरणांचे प्रमाण सर्वाधिक असते. अर्थातच हीच वेळ ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी सर्वात योग्य असते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://timesofindia.indiatimes.com/city/pune/Low-on-vitamin-D-Just-soak-in-the-sun-between-11am-1pm/articleshow/50244279.cms|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=}}</ref> ह्या वेळेत आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस रोज १५ ते 20 मिनिटे त्वचेवर घेतलेले ऊन पुरेसे ड जीवनसत्त्व मिळवून देऊ शकते. त्यासाठी रोजच उन्हात बसणे आवश्यक नसते. सकाळच्या कोवळ्या उन्हाची तीव्रता  प्रकाश जास्त विखुरल्यामुळे कमी असते तसेच त्यावेळी त्यातील उपयोगी अतिनील ब किरणांचेही प्रमाण कमी असते. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन आवश्यक तेवढे ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी पुरेसे होत नाही. भर दुपारी आणि त्यानंतर संध्याकाळी मात्र उन्हात शरीरास अपायकारक अतिनील अ किरणाचे (UVA )प्रमाण जास्त असते त्यामुळे तसे ऊन त्यावेळी त्वचेवर जास्त वेळ घेणे हितावह नसते.
 
अतिनील ब प्रकारचे किरण काचेतून गाळले जात असल्यामुळे आरपार जाऊ शकत नाहीत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/19614895|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=}}</ref>. त्यामुळे खिडकीच्या काचेतून वक्रीभवन होऊन त्वचेवर पडलेले ऊन ड जीवनसत्त्व मिळवण्यासाठी उपयोगी ठरू शकत नाही. त्यासाठी ऊन हे थेट त्वचेवर पडणे आवश्यक आहे.
 
==हे ही पहा==