"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. २०१७ स्रोत संपादन
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ३१:
जोतिबा फुले यांचे मूळ गाव [[सातारा]] जिल्ह्यातील [[कटगुण]] हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार [[पुरंदर]] तालुक्यातील [[खानवडी]] येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
 
जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी [[भाजी]] विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्ता याने महात्मा फुले यांना 'सेंद्रीय बुद्धीवंत' असे संबोधले आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maharashtrache%20Shilpkar%20Mahatma%20Jyotiba%20Phule.pdf|शीर्षक=महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतीबा फुले|last=गुंदेकर|first=श्रीराम|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref>
 
==शैक्षणिक कार्य==