"जॉन डाल्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
छो (Pywikibot 3.0-dev)
(जन्म : ६ सप्टेंबर, १७६६) (मृत्यू: २७ जुलै, १८४४)
 
जॉन डाल्टन हा ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ; भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ होता. “आधुनिक अणु सिद्धांता” मांडण्यासाठी जॉन डाल्टनची ओळख आहे. डाल्टनचा जन्म क़्वाकर कुटुंबात इंग्लंडच्या कुम्बरलॅन्ड प्रदेशातील कॉकरमाऊथ च्या जवळ असलेल्या इगल्सफील्ड या गावी दिनांक ६ सप्टेंबर रोजी झाला. त्याचे वडील विणकर होते. डाल्टनचे शिक्षण गावाजवळच असलेल्या पर्डशाव-हॉल खाजगी शाळेत झाले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी डाल्टन मॅंचेस्टरच्यामँचेस्टरच्या “नव महाविद्यालय” (न्यू कॉलेज) येथे निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित विषय शिक्षक पदावर रुजू झाला. येथे तो त्याच्या वयाच्या चौतिसाव्या वर्षापर्यंत काम केले. निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित याच विषयात, खाजगी शिक्षक (ट्युटर) म्हणून काम करायचे असे डाल्टननी ठरविले आणि प्रारंभ केले.
 
अर्थार्जनासाठी निसर्ग तत्व-ज्ञान आणि गणित या विषयात काम करीत असला तरी त्याच्या आवडीचा विषय म्हणजे हवामानशास्त्र. वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणांना भेटी देऊन तेथील हवामानासंबंधी माहिती एकत्र करण्याचा त्याला छंद होता. हवेतील वायू घटक पृथ्थकरण करण्याच्या निमित्ताने, डाल्टनला रसायन शास्त्राची गोडी लागली.
६३,६६५

संपादने