"ख्रिस्तजन्म तारीख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_द्वारे_सफाई
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १०:
मध्यरात्रीचा मिस्सा बेंथलहेम येथे अर्पण केला जाई. हे इस्राएल या देशातील एक छोटेसे गाव आहे. या गावी ख्रिस्ताचा जन्म झाला. या गावातून मग लोकांची मिरवणूक निघे. ती जेरुसलेम येथे पहाटे पोहोचत असे. तेथे दुसरा मिस्सा अर्पण केला जाई. दिवसा याच शहरातील महामंदिरात सर्व ख्रिस्ती लोक एकत्र जमत व तिसरा मिस्सा अर्पण होत असे.
 
६ व्य शतकात डायनासिअस या मठवासी धर्मगुरूने ख्रिस्ताच्या जन्माचे वर्ष कोणते असावे. याबाबतचे आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक घटनांच्या तारखांचे एक गणित मांडले. ते थोडेसे कसे चुकले ते आपण नंतर पाहू. त्याने ख्रिस्तजन्मापूर्वीच्या वर्षाना बी. सी. (B.C.) म्हणजे बिफोर ख्राइस्ट ('''B'''EFORE '''C'''HRIST) आणि ख्रिस्तजन्मापासूनच्या वर्षाना अॅनोॲनो डोमिनी (A.D.) म्हणजे प्रभूचे वर्ष अशा नावाने संबोधण्याचा प्रघात पाडला. यातील एकाची आद्याक्षरे इग्रजी व दुसऱ्याची आद्याक्षरे लॅटिन का याचे कोडे अजून कुणाला उलगडले नाही. कालांतराने तारखांचे अधिक अचूक गणित मांडण्यात आले. तेव्हा लक्षात आले की ख्रिस्ताच्या जन्मतारखेचे वर्ष जवळजवळ ६ ते ७ वर्षांनी चुकले होते. परंतु आता तर डायनासिअसचे कॅलेंडर जगभर प्रचारात आले होते. ते बदलता येणे शक्य नव्हते. आजही हेच डायनासिअसचे कॅलेंडर वापरले जात आहे. मात्र इसवी सन पूर्वी ६ ते ७ वर्ष आधी ख्रिस्ताचा जन्म झाला हे अभ्यासकांचे मत निश्चित झाले आहे.
 
ख्रिस्ताच्या जन्मापासून इसवी सन सुरू झाला, याचा अर्थ १ जानेवारी इसवी सन १ ला ख्रिस्ताचा जन्म झाला, मग २५ डिसेंबरला ख्रिस्तमस साजरा करतात हे कसे ? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर असे की, ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा डायनासिअसचे कॅलेंडर अस्तित्वात नव्हते. ते कसे असेल ? कारण ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षांनी डायनासिअसने आपले कॅलेंडर बनविले. रोमन किवा यहुदी लोकांची जी दिनदर्शिका त्याकाळी रुढ होती, त्यानुसार ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची नोंद कुणी केली नव्हती. ख्रिस्तजन्म झाला त्या दिवसापासून कुणी तेथूनच १ जानेवारी इसवी सन १ असे मोजायला सुरुवात केली असे नव्हे. तर ख्रिस्तजन्मानंतर ६०० वर्षानंतर (इसवी सन ६ व्या शतकात) डायनासिअसने गणिती पद्धतीने ख्रिस्तजन्माचा काळ ठरवला आणि ख्रिस्तजन्मवर्षाला इसवी सन १ असे कल्पून तेथून पुढे ६०० वर्षांची दिनदर्शिका (कॅलेंडर) गणिती पद्धतीने त्याने तयार केली. ख्रिस्तजन्माचे वर्ष त्याने गणिती पद्धतीने ठरविले पण त्याने तारीख ठरविली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेही गणित ६ ते ७ वर्षांनी कसे चुकले हे आधी आपण पाहिलेच आहे. पहिले पोप लिबेरिअस यांनी चवथ्या शतकात ख्रिस्तीधर्मीयांसाठी निश्चित केलेली ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची तारीख २५ डिसेंबर असणे शक्यच नव्हते कारण तोपर्यंत डायनासिअसचे कॅलेंडर तयार झाले नव्हते. तसेच रोमन लोक जो सूर्यदेवाचा सण साजरा करीत तोही २५ डिसेंबरला, असें जे वर्णन वर आले आहे ते वाचून रोमन लोकांच्या काळात डायनासिअसचे इग्रजी कॅलेंडर होते काय असा कुणी प्रश्न करील. खरे पाहता डायनासिअसचे इग्रजी कॅलेंडर तयार होण्यापूर्वी दिनक्रम मोजण्याच्या रोमन व यहुदी दिनदर्शिका होत्या. परंतु त्यांत फारच त्रुटी होत्या. डायनासिअसने सहाव्या शतकात अधिक परिपूर्ण अशी दिनदर्शिका तयार केली व त्यानुसार पुढच्या व मागच्या काही घटनांच्या तारखा ठरविण्यात आल्या. या गणिती पद्धतीनुसार रोमन लोक सूर्यदेवाचा सण साजरा करीत ती तारीख आणि पहिले पोप लिबेरिअस यांनी ख्रिस्तजन्मोस्तवासाठी निश्चित केलेली तारीख इंग्रजी कॅलेंडरनुसार २५ डिसेंबर असल्याचे निश्चित झाले. <ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=(झेप येशूची २००० वर्षाकडे)|last=फादर हिलरी फर्नांडीस|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>