"पतंगराव कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उपयुक्त माहिती दिली .
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
उपयुक्त माहिती दिली .
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११:
 
== शैक्षणिक कार्य ==
डॉ. पतंगराव कदम यांनी केवळ विशीत असताना १९६४ मध्ये पुण्यतल्या सदाशिव पेठेतील एका दहा बाय दहाच्या खोलीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. १९६८ साली एरंडवणे ,पुणे येथे शंकरराव मोरे विद्यालयाची स्थापना केली .एरंडवणे , पुणे येथे यशवंतराव मोहिते महाविद्यालय , लाँँ कॉलेज व मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची स्थापना करून भारती विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला . १९८३ साली डॉ . वसंतदादा पाटील यांच्या प्रेरणेने धनकवडी , पुणे येथे इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना केली . आपले विद्यापीठ स्थापन व्हावे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि काही दशकांनंतर अभिमत विद्यापीठाच्या रूपाने त्यांनी ती प्रत्यक्षातही आणली. ते भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटीचे नुसतेच संस्थापक नसून कुलगुरू देखील होते. स्थापनेनंतरच्या ५३ वर्षांत संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकविणारी १८० शाळा-कॉलेजेस आहेत, त्यांत दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, सुमारे वीस हजार कर्मचारी नोकरीस आहेत. त्यामध्ये नवी दिल्ली आणि दुबईमध्येही त्यांनी अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि संगणक विज्ञान या विषयांची महाविद्यालये स्थापन केली आहेत. भारती विद्यापीठ ही भारतातलया नामवंत व अग्रेसर संस्थांपैकी एक आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या कदम यांनी राज्यच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतही शिक्षणाचे अक्षरश: साम्राज्यच निर्माण केले. वाडवडील किंवा घराण्याचा कोणताही आधार नसताना पतंगरावांनी राजकीय-सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत अनेक वर्षे आपले पाय घट्ट रोवले.
* डॉ. कदम काॅंग्रॆस पक्षातर्फे महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून गेले होते.<ref>[http://marathi.vishwajeetkadam.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8+/default.aspx]</ref>
* डॉ. कदम याणी स्थापन केलेल्या संस्थांमध्यॆ सोनहिरा सहकारी कारखाना लि. वांगी, ता. कडेगाव, जि.सांगली, सागरेश्वर सहकारी सूत गिरणी व कृष्णा-वेरळा सहकारी सूत गिरणी लि. पलूस, जि.सांगली, ग्राहक भांडार आणि एक मल्टीशेड्यूल्ड (भारती सहकारी) बँक, पुणे, सांगली आणि कडेगावमध्ये भारती बाजार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्था आदींचा समावेश आहे. भारती विद्यापीठासह या संस्था आणि विविध ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो गरीब कुटुंबे आणि विद्यार्थ्यांनाही भरीव मदत केली आहे.