"पतंगराव कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उपयुक्त माहिती दिली .
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
उपयुक्त माहिती दिली .
ओळ ५:
 
== राजकीय वाटचाल ==
पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जात. तेयशवंतराव चव्हाण साहेब यांची जन्मभूमी असलेल्या भिलवडी - वांगी मतदारसंघातून १९८५ साली आमदार म्हणून निवड झाली .१९९० साली भिलवडी - वांगी मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवड झाली . १९९० मध्ये प्रथम राज्याचे शिक्षणमंत्री बनले. १९९२ साली शिक्षण व पाटबंधारे खात्याचे मंत्री झाले . पुढे सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचे पतंगराव अविभाज्य घटक होते. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी उद्योग, वाणिज्य, संसदीय कामकाजमंत्री म्हणून पदभार सांभाळला. नोव्हेंबर २००४मध्ये ते सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री बनले. मार्च २००९ मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले. १९ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांच्याकडे वन, मदत आणि पुनर्वसन खात्याची धुरा आली. सांगलीतील वांगी-भिलवडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्याने भरीव मताधिक्याने विजयी होत. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले. दिल्लीतील वरिष्ठांशीही अत्यंत घनिष्ठ संबंध होते. अघळपघळ, आणि स्पष्टपणे मनातील गोष्ट बोलून दाखविणे, हा त्यांचा स्वभावविशेष होता.
 
== लोकप्रिय नेता ==