"एशियाटिक सोसायटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Changing to standardized template.
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
{{संकोले}}
{{विस्तार}}
कला, विज्ञान आणि संस्कृती यांचे जतन करण्यासाठी १८०४ साली सर जेम्स मॅकिन्टॉश यांनी बॉम्बे लिटररी सोसायटीची (आताची एशियाटिक सोसायटी) स्थापना केली होती. १८३० साली बांधण्यात आलेल्या टाऊन हॉलच्या बिल्डिंगमध्ये या सोसायटीचा कारभार हलवण्यात आला. तेव्हापासून येथूनच सोसायटीचा कारभार चालतो आहे. ग्रंथालय स्थापनेच्या दृष्टीने ही महाराष्ट्रातील हा पहिला प्रयत्न होता.
 
दुर्मिळ पुस्तकांबरोबरच संस्कृत, प्राकृत, पशिर्यन, अरेबियन, मराठी, गुजराती, उर्दू, ग्रीक, लॅटिन, इटालियन आणि इंग्रजी या भाषांतील हस्तलिखिते सोसायटीकडे आहेत. या संग्रहालयात एक लाखाहून अधिक ग्रंथ (म्हणजे किमान २ कोटी पाने), अडीच हजार पोथ्या व हस्तलिखिते आणि १२०० हून अधिक नकाशे आहेत. दान्ते या मध्ययुगीन इटालियन कवीच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ची १४व्या शतकातील हस्तलिखित प्रत [[माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन]] यांनी या संग्रहाला दिली होती, ती आजही सोसायटीच्या वैभवाची एक खूण आहे. [[पु.ल. देशपांडे]] आणि [[दुर्गा भागवत]] यांच्या कुटुंबीयांकडून या थोर मराठी लेखकांच्या सार्‍या हस्तलिखितांचे बाडदेखील ‘एशियाटिक सोसायटी’च्या सुपूर्द झाले आहे. हस्तलिखितांमध्ये अर्थातच, जुन्या संस्कृत व प्राकृत पोथ्यांचा समावेश प्रामुख्याने आहे. हा स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा ठेवा आता संगणकीय स्वरूपात चिरंतन होण्याच्या मार्गावर आहे.
 
मुंबईचे शिल्पकार मानल्या गेलेल्या [[जगन्‍नाथ शंकरशेठ यांचा एकमेव पूर्णाकृती पुतळा याच इमारतीत आहे. या संस्थेच्या कार्यामध्ये नाना शंकरशेट मुर्कुटे यांनी आपले भरीव योगदान दिले. या संस्थेच्या माध्यमातून प्राचीन परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याचा प्रयत्न केला गेला.
 
१९९४ मध्ये एशियाटिक सोसायटी व सेंट्रल लायब्ररीचे विभाजन झाले , तेव्हा केंद सरकारने एशियाटिकला दोन कोटी रुपयांची देणगी दिली. ही रक्कम युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (युटीआय) च्या बाँड्समध्ये गुंतवण्यात आली. युटीआय आर्थिक संकटात आल्यावर व्याजापोटी मिळणारी रक्कम आटली आणि एशियाटिक धोक्यात आली. <ref>[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=145089 'एशियाटिक'चे अश्रू]{{मृत दुवा}} [http://archive.is/FSRw विदागारातील आवृत्ती] 19 Oct 2009 07:23:44 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे. </ref>