"आयुर्विमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १४:
 
=== मुदती विमा ===
सर्व विमा योजनांत्‌ शुद्ध असलेलि मुदती विमा ( टर्म योजना ) ही जोखमीला विमाछत्र देते आणि जोखिम म्‍हणजे मृत्यू. येथे एकरकमी अदायगी ही केवळ निवडलेल्‍या कालावधीत मृत्‍यू झाल्‍यास देय असते. इन्‍शुअर व्यक्ती निवडलेल्‍या कालावधीच्या समाप्‍तीपर्यंत जिवंत राहिल्‍यास, काहीही देय बनत नाही. या प्रकाराच्या योजनांमध्ये फक्त संरक्षण हा घटक असतो आणि पॉलिसीबरोबर मुदतपूतीर् फायदा मिळत नाही. उदाहरणार्थ, विशिष्ट घटना घडल्यासच (मृत्यू) योजनाधारकाला या योजनेखाली पैसे दिले जातात. दुदैर्वाने, अशी वेळ आली तर त्यांना आणि त्यांच्या कुटंुबांनाकुटुंबाना मोठे आथिर्कआर्थिक संरक्षण मिळते. टर्म इशुरन्स योजना सामान्यपणे कमी खर्चाच्या असतात. ऑनलाइन खरेदी केल्यास टर्म इन्शुरन्स योजना आणखी कमी खर्चात मिळतात.
 
मुदती विमायोजना या निव्वळ विमा योजना आहेत, म्हणजे, त्यांची रचना व किंमत अशा तऱ्हेने ठरवण्यात येते की खूप महत्त्वाची घटना घडल्यावर संबंधित व्यक्तीला पैसे देता यावेत म्हणून जणू काही योजनाधारक, एक गट म्हणून, त्यांचे हप्ते एकत्र करतात. यामुळेच अशी घटना घडल्यावर जो फायदा मिळू शकतो त्याच्या तुलनेत हे संरक्षण पुरवण्यासाठी प्रत्येक योजनाधारकाला येणारा खर्च अगदी बेताचा असतो. यात बचतीचा घटक नसल्याने जीवन विमा कंपनीला फंडाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोणताही खर्च येत नाही.