"सिंधुदुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४१:
 
==घडण व पहाण्यासारखी ठिकाणे==
सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तराभिमुख एक [[खिंड]] दिसते. या खिंडीतून आत गेले की दुर्गाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यानंतर मारुतीचे छोटेखानी मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा १५ मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इ.स.१८१२पर्यंत फडकत होता.
 
गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुका रोखण्यासाठी तटाला भोके ठेवली आहे. सैनिकांसाठी पायखाने आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे विशेष होय. कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला आहे. असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.
ओळ ४७:
सिंधुदुर्ग किल्ला [[मालवण]]पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. १९६१ साली तत्कालीन मुख्यमंत्री [[यशवंतराव चव्हाण]] यांनी तटाची दुरुस्ती केली.
 
विषेश म्हणजे या किल्यामध्ये एका नारळाच्या झाडाला दोन फांद्या (वाय) आकाराच्या होत्या, अलीकडे त्यातील एक फांदी जोराच्या वाऱ्यानेवीज पडल्यामुळे मोडली आहे.
[[चित्र:Fort Sindhudurg.jpg|इवलेसे|डावे|सिंधुदुर्ग द्वार]]