"जे. कृष्णमूर्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ५९:
 
==उत्तरायुष्य==
जगभरात सार्वजनिक भाषणे, गटचर्चा हे कृष्णमूर्तींचे नेहमीचे कार्यक्रम उत्तरायुष्यातही सुरू राहिले. १९६० च्या दशकाच्या प्रारंभी [[डेविडडेव्हिड बॉम]] या भौतिकविद्वानाशी कृष्णमूर्तींचा परिचय झाला. भौतिक विश्वाचे सार, मनुष्यजातीची मानसिक व सामाजिक अवस्था याबाबत बॉमच्या तात्त्विक व शास्त्रीय मतांना जुळणारी स्थळे कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानामध्ये होती. हे दोघे लवकरच घनिष्ट मित्र बनले. वैयक्तिक संवाद, गटचर्चा या माध्यमांमधून विचारांचे आदानप्रदान या दोघांमध्ये सुमारे दोन दशके सुरू राहिले. ह्या चर्चा पुस्तकरूपातपुस्तकरूपांत प्रसिद्ध झाल्याने कृष्णमूर्तींच्या विचारांचा शास्त्रीय वर्तुळात शिरकाव झाला. कृष्णमूर्तींचे तत्त्वज्ञान धार्मिक अभ्यास, शिक्षण, मानसशास्त्र, भौतिकी, चेतनेचा अभ्यास अशा विविध विषयांवरील असले तरी विद्यापिठीय वर्तुळात त्यांची आजवर चर्चा झाली नव्हती. [[फ्रिजॉफ काप्रा]], [[जॉर्ज सुदर्शन]] हे भौतिकविद्, जीवशास्त्रज्ञ [[रुपर्ट शेल्ड्रेक]], मानसशास्त्रज्ञ डेव्हिड शेनबर्ट यांच्यासोबत अनेक मानसोपचारतज्ज्ञांशी कृष्णमूर्तींनी चर्चा केल्या. नंतरच्या काळात कृष्णमूर्ती-बॉम यांच्या मैत्रीत कटू प्रसंग आले आणि आधीसारखी घनिष्ट नसली तरी या दोघांमधील मैत्री कृष्णमूर्तींच्या निधनापर्यंत टिकून राहिली.
 
अनेक विषयांमध्ये कृष्णमूर्तींच्या प्रतिभेने विहार केला असला तरी त्यांची मूलभूत शिकवण टिकून राहिली. १९२९ मध्ये ज्या गोष्टींशी असलेली बांधिलकी त्यांनी बोलून दाखविली होती, त्याबद्दल १९८० च्या दशकात ''कोअर ऑफ द टीचिंग'' या लिखित वक्तव्यात ते पुन्हा 'बोलले' :