"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
Shailaja Deshpande (चर्चा)यांची आवृत्ती 1694458 परतवली.
खूणपताका: उलटविले
ओळ ४१:
'''सांगली''' {{audio|Sangli.ogg|उच्चार}} हे महानगर [[पश्चिम दिशा|पश्चिम]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] (पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख महानगर आहे) वसलेले आहे. सांगलीची इ.स.२००८ सालची लोकसंख्या५,०२,६९७ च्या आसपास आहे. हे शहर [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. ते [[कृष्णा नदी]]च्या काठावर वसलेले आहे.
 
मुख्य भाषा [[मराठी भाषा|मराठी]] असून [[कन्नड भाषा|कन्नड]], [[हिंदी भाषा|हिंदी]] आणि [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषाही येथे बोलल्या जातात. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे यांची ही जन्मभूमी आहे. सांगली संस्थानचे तत्कालीन राजा, चिंतामणराव पटवर्धन ह्यांच्या पुढाकाराने संस्थानात ('सीता स्वयंवर)' ह्या संगीत नाटकाचं पहिल्यांदाच सादरीकरण करण्यात आलं जे विष्णुदास भावे ह्यांनी लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासात नाटक ह्या गोष्टीची सुरुवात सांगलीपासून झाली त्यामुळे सांगलीला ("नाट्यपंढरी") ह्या नावानेही संबोधलं जातं. सांगलीच्या पटवर्धन संस्थानचे भव्य गणेश मंदिर पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर आहे.
 
सांगली शहर हे पहिलवानांसाठी प्रसिद्ध आहे. हिंदकेसरी [[मारुती माने]] याच मातीतले. कुस्तीगीरांचे शहर अशीही सांगलीची ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीसह [[कुंडल]], [[पलूस]], [[शिराळा]], [[वाळवा]], [[मिरज]], [[कोल्हापूर]] ह्या ठिकाणी ही कुस्ती ला प्राधान्य दिलं जातं. ह्या ठिकाणी भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येतात .
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले