"भुजरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
→‎स्वरूप: संदर्भ घातला
ओळ ३:
गव्हाच्या या कोवळ्या रोपांना भुजलिया किंवा कजलिया म्हणतात. काही पंचांगांत या सणाचे नाव कजलिया पर्व असे दिलेले आढळते.
या सणादरम्यान लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतेक व्यक्ती भुजलियांची देवाणघेवाण करताना दिसतात. या दिवशी देशात समृद्धी आणि शांती रहावी अशी कामना केली जाते. गावातील लोकांमधील जातिभेद दूर होऊन सदभाव नांदावा यासाठी हा सण उत्साहात साजरा होतो. भुजरिया पर्वाच्या दिवशी विविध संस्था भुजरिया संमेलन भरवतात.
भुजरिया सणाच्या निमित्ताने घरात राखून ठेवलेल्या गव्हाच्या बियाणांची गुणवत्ता तपासली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=Z6OYRUEAF7oC&pg=PA186&dq=bhujariya+festival&hl=en&sa=X&ved=0ahUKEwj45qqmhdzjAhVKQ48KHTjKDyk4ChDoAQg3MAM#v=onepage&q=bhujariya%20festival&f=false|title=Festivals In Indian Society (2 Vols. Set)|last=Sharma|first=Usha|date=2008-01-01|publisher=Mittal Publications|isbn=9788183241137|language=en}}</ref> या सणाच्या दिवसाआधी, म्हणजे श्रावण शुक्ल नवमीला एका बांबू आणि मोहाच्या पानांनी बनलेल्या टोपलीत माती भरून तीत कोठारात बिजाणे म्हणून जपून ठेवलेल्या गव्हाचे थोडे दाणे पेरतात. भुजरियाच्या दिवशी टोपलीत उगवलेली कोवळी रोपे उपटून ती तलावावर किंवा नंतर त्यांची पूजा करून त्यांची मिरवणूक काढतात. <ref name=":4" />नंतर गावकरी त्या रोपांची आपआपसात देवाणघेवाण करून त्यांची गुणवत्ता तपासतात. या सणाच्या दिवशी तलावांवर जत्रेचे वातावरण असते.
 
<br />
"https://mr.wikipedia.org/wiki/भुजरिया" पासून हुडकले