"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ISBN fix
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ २२:
 
== देवानांपिय पियदसि म्हणजेच राजा अशोक असे निश्चित ==
[[चित्र:Gujarra Edict.jpg|rightउजवे|thumbइवलेसे|250px|अशोकाचा गुजर्रा येथील शिलालेख- या शिलालेखात "देवानांपियस पियदसिनो असोकराजस" असा उल्लेख आढळला.]]
 
इसवीसन १९१५ मधे कर्नाटक राज्यातील रायचूर या जिल्ह्यात मास्की या गावी सी. बिडॉन या खाण अभियंत्यास एक शिलालेख सापडला.या शिलालेखात नेहेमीच्या "देवानांपिय पियदसि" ऐवजी "देवानांपियस असोकस" असा उल्लेख आढळला. पाठोपाठ कर्नाटकातीलच बेल्लारी जिल्ह्यातील नित्तूर या गावी अशोकाचे दोन लघु-शिलालेख सापडले. या शिलालेखात "देवानांपिय पियदसि" ऐवजी "राजा असोक" असा उल्लेख आढळला. नित्तूरपासून जवळच उदेलगोलम या गावी दोन शिलालेख सापडले. या दोहोंपैकी एक क्षतिग्रस्त झालेला होता परंतु दुसऱ्या शिलालेखात "देवानांपिय पियदसि" ऐवजी "राजा असोको देवानांपियो" असा उल्लेख आढळला. आणि देवानांप्रिय प्रियदर्शी म्हणजेच इ.स.पू. २७२ ते २३२ मधील भारतीय राजा सम्राट अशोक हे सिद्ध झाले. इ.स. १९५५ मधे मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील गुजर्रा या गावी अशोकाचा आणखी एक शिलालेख सापडला या शिलालेखात "देवानांपियस पियदसिनो असोकराजस" असा उल्लेख आढळला. अशा प्रकारे देवानांप्रिय प्रियदर्शी म्हणजेच सम्राट अशोक, या सत्यावर शिक्कामोर्तब झाले.
ओळ २८:
== शिलालेखांची भाषा आणि लिपी ==
 
अशोकाच्या कोरीव लेखांची संख्या चाळीसच्या आसपास असून मोठ्या शिळांवरील राजाज्ञा, लहान शिळांवरील राजाज्ञा, स्वतंत्र दगडावरील राजाज्ञा, मोठ्या स्तंभावरील व लहान स्तंभावरील राजाज्ञा अशा पाच गटात त्याची विभागणी केली जाते. अशोकाचे नाव फक्त लहान शिळांवरील राजाज्ञांच्या प्रतिकृतीत आढळते. अन्य कोरीव लेखांवर फक्त देवानाम पिय पियदस्सी एवढाच त्याचा उल्लेख येतो. अशोकाचे हे लेख सामान्यपणे [[प्राकृत भाषा|प्राकृत भाषेत]] आणि [[ब्राह्मी लिपी|ब्राह्मी लिपीत]] कोरलेले आढळतात परंतु भारताच्या वायव्य भागात आढळलेले लेख [[अ‍ॅरेमाइक भाषा|आरमाइक भाषेत]] व [[खरोष्ठी लिपी|खरोष्ठी लिपीत]] आढळतात. [[अफगाणिस्तान|अफगाणिस्तानात]]ात ते आरमाइक व [[ग्रीक भाषा|ग्रीक भाषांमध्ये]]ंमध्ये कोरलेले आहेत.
 
== दगडी शिलालेख ==
ओळ ४३:
 
== स्तंभावरील शिलालेख ==
[[चित्र:AshokaLions.jpg|rightउजवे|thumbइवलेसे|250px|अशोकाचा सारनाथ येथील स्तंभशीर्ष]]
सम्राट अशोकाने प्रजेच्या हितासाठी व धर्मोपदेशासाठी आज्ञा ज्या दगडी स्तंभांवर कोरलेल्या आहेत त्यांना अशोकस्तंभ म्हणतात. उपलब्ध स्तंभांपैकी सर्वात लहान स्तंभ सहा मीटर उंचीचा असून, सर्वात उंच स्तंभ एकवीस मीटर उंचीचा आहे. सर्वात मोठ्या स्तंभाचे वजन पन्नास टन, व्यास ०.७६ मीटर आणि जमिनीखालील भाग ०.३७ चौरस मीटर आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://203.199.132.154/vishwakosh/index.php?option=com_content&view=article&id=1555%3A2010-12-24-05-11-45&catid=1&Itemid=2 | शीर्षक=अशोकस्तंभ | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ | अ‍ॅक्सेसदिनांक=२९ जानेवारी, इ.स. २०१२}}</ref>. सर्व अशोकस्तंभांमध्ये [[सारनाथ]] येथील स्तंभ सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. इ.स. १९०५ मध्ये केलेल्या उत्खननात याचे फक्त स्तंभशीर्षच सापडले. ते दोन मीटर उंचीचे असून सध्या ते सारनाथ येथील संग्रहालयात ठेवलेले आहे. [[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताकाने]]ाने पहिल्या [[भारतीय प्रजासत्ताक दिन|प्रजासत्ताकदिनी]] या स्तंभाचे शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले. या स्तंभशीर्षावरील चार सिंह विशिष्ट मौर्यशैलीत कोरलेले असून त्याखालील चित्रमालिकेत हत्ती, घोडा, बैल, सिंह व चोवीस आरे असलेले चक्र आहे. त्याखाली उलटे कमळ कोरलेले आहे. हे चक्र सत्यधर्माचे व व शांततामय परिवर्तनाचे प्रतीक आहे, असे वर्णन भारतीय तत्त्वज्ञ डॉ. राधाकृष्णन यांनी केले आहे <ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://203.199.132.154/vishwakosh/index.php?option=com_content&view=article&id=1551%3A2010-12-24-05-11-45&catid=1&Itemid=2 | शीर्षक=अशोकचक्र | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ | अ‍ॅक्सेसदिनांक=२९ जानेवारी, इ.स. २०१२}}</ref>. अशोकाच्या उपलब्ध सात स्तंभलेखांपैकी टोपरा (अंबाला जिल्हा) व मीरत येथे आढळलेले स्तंभ दिल्लीत ठेवलेले आहेत.
 
=== चौथ्या स्तंभालेखाचा अनुवाद ===
देवांनाप्रिय प्रियदर्शी राजा असे म्हणाला. अभिषेकानंतर सव्वीस वर्षांनी मी हा धम्मलेख लिहविला. माझे रज्जुक (सम्राट अशोकाचे राजकिय अधिकारी) अनेक लक्ष प्राणि आणि लोकांमधे नेमलेले आहेत. त्यांनी वरदान द्यावे कि शिक्षा द्यावी हे (त्यांच्या) स्व-हेतु (आत्म-विवेका) वर ठेवले आहे. का ? रज्जुकांनी आश्वस्त आणि निर्भयपणे कार्यप्रवृत्त व्हावे व जनते साठी देशा साठी हित-सुख उपलब्धीचा अनुग्रह करावा. ते (जनतेचे) सुख-दुःख जाणतील आणि धंमयुक्तांना (धम्मा प्रमाणे वागणाऱ्यांना) प्रेरित करतील ज्या योगे ते (धम्मयुक्त) इहलोकात व परलोकात प्रसन्न होतील. रज्जुक माझ्या आज्ञापालनास उत्सुक असतात. माझे (राज)पुरुष (अधिकारी) माझ्या इच्छेनुसार परिचर करुन अनेक प्रेरणा देतील यामुळे माझे रज्जुक मला प्रसन्न करण्यास समर्थ होतील. जसे (कोणी) आपत्य कुशल दाईकडे सोपवून आश्वस्त होतो की ही कुशल दाई माझ्या आपत्याचे सुखकर पालन करण्यास समर्थ आहे, अशाच प्रकारे मी देशाच्या हित-सुखासाठी रज्जुक नियुक्त केले आहेत. रज्जुकांनी निर्भय, आश्वस्त व शांतचित्त होउन प्रसन्नतेने कार्य करण्यास प्रवृत्त असावे म्हणून त्यांनी वरदान द्यावे कि शिक्षा द्यावी हे मी (त्यांच्या) स्व-हेतु (आत्म-विवेका) वर ठेवले आहे. हे माझ्या इच्छेनुसार आहे, का ? कारण व्यवहार-समता आणि शिक्षा-समता असावी (व्यवहारात व शिक्षेत पक्षपात नसावा). माझा आदेश आहे की जे बंदिवान आहेत त्यांना तोलुन (विचारपूर्वक) शिक्षा द्यावी आणि ज्यांना मृत्यूदंड दिला आहे त्यची सुचना तीन दिवस पूर्व मला द्यावी. या दिवसात नातेवाइक वा इतर अनेक त्याच्या जीवीताकडे (पुनर्विचारास्तव) ध्यानाकर्षण करतील अथवा तसे ध्यानाकर्षण करु (शकणे) नसल्यास त्याच्या (पारलौकिक) संरक्षणासाठी दान देणे किंवा उपवास करणे करतील. कारण माझी इच्छा आहे की बंदिवास-काळातही (त्यांनी) पार-प्रसन्न (पारलोकी सुखी) असावे. या प्रकारे लोकांमधे विविध प्रकारे धम्माचरण, संयम आणि योग्य-भागी (योग्य ठिकाणी) दान देणे यात वृद्धी होइल.
 
== शिलालेखांचे ऐतिहासिक महत्त्व ==
 
अशोकाचे [[शिलालेख]] हे अशोकाच्या कारकिर्दीच्या इतिहासाची अतिशय महत्त्वाची अशी साधने आहेत. ज्या ज्या ठिकाणी हे आलेख सापडले त्यावरुन [[मौर्य साम्राज्य|मौर्य साम्राज्याच्या]]ाच्या सीमा निश्चित करणे शक्य होते. अशोकाच्या कारकिर्दीत झालेल्या [[कलिंगचे युद्ध|कलिंगच्या युद्धाची]] माहिती त्याच्याच कलिंग आलेखातून मिळते. अशोकाच्या कारकिर्दीचा कालानुक्रम निश्चित करण्यासाठी या आलेखांची मदत झाली. अशोकाने [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्माचा]]ाचा स्वीकार केल्याचा पुरावा यामधून मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने केलेल्या कामगिरीचे वर्णन यातून मिळते. बौद्ध धर्माची दीक्षा घेतली असली तरी, अशोक कर्मठ नव्हता तसेच आपल्या प्रजाजनांवर बौद्ध धर्म सक्तीने लादण्याचा अशोकाने कधीच प्रयत्न केला नसल्याचेही या आलेखांतून स्पष्ट होते. परदेशात बौद्ध धर्म आणि [[भारतीय संस्कृती]]चा प्रसार करण्यासाठी अशोकाने बौद्ध भिक्षूंना पाठवल्याचा लेखी पुरावा या शिलालेखांतून मिळतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | शीर्षक=हिस्ट्री ऑफ एन्शन्ट इंडिया | accessdate=January 30, 2012 | दुवा=http://books.google.co.in/books?id=NwpWPgAACAAJ&dq=history+of++ancient++india+j+l+mehta&hl=en&sa=X&ei=37D1Tp3TBor4rQeK4LDZDw&ved=0CDUQ6AEwAA | प्रकाशक=लोटस प्रेस | भाषा=इंग्रजी | लेखक=जे.एल. मेहता, सरिता मेहता | आयएसबीएन=978-81-8382-137-7}}</ref>
 
== चित्रदालन ==
<gallery>
चित्र:Ashoka Edict Girnaar1.png|गिरनार येथील शिलालेख
चित्र:Ashoka Edict Girnaar2.png|गिरनार येथील शिलालेख
चित्र:Ashoka Edict Girnaar3.png|गिरनार येथील शिलालेख
चित्र:Ashoka edict dhauli1.png|धौली येथील शिलालेख
चित्र:Ashoka edict dhauli2.png|धौली येथील शिलालेख
चित्र:Ashoka edict dhauli3.png|धौली येथील शिलालेख
ओळ ८९:
 
== हे ही पहा ==
* [[अशोकस्तंभ]]
* [[अशोकचक्र]]
* [[सत्यमेव जयते]]
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
ओळ ९८:
{{कॉमन्स वर्ग|Edicts of Ashoka|{{लेखनाव}}}}
 
* {{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.katinkahesselink.net/tibet/asoka1.html | शीर्षक=अशोकाच्या आलेखांचे भाषांतर | अ‍ॅक्सेसदिनांक=२९ जानेवारी, इ.स. २०१२ | भाषा=इंग्रजी}}
* {{इन अवर टाइम|{{लेखनाव}}|b00sbrz1|pillar_off_ashoka}}
* {{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://www.bbc.co.uk/ahistoryoftheworld/objects/acRBNzquSrOA5ZYNmLWA_g | शीर्षक=हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड इन हंड्रेड ऑब्जेक्ट्स | अ‍ॅक्सेसदिनांक=१२ फेब्रुवारी, इ.स. २०१२ | भाषा=इंग्रजी}}
 
[[वर्ग:मौर्य साम्राज्य]]