"ई-कचरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४:
इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, मोबाईल्स यासारख्या आपल्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची गरज बनलेल्या वस्तूंमुळे जगभरातल्या पर्यावरणाच्या समस्या वाढत आहेत. यातील सर्वात मोठी समस्या आहे ती ई-कचर्‍याची. बिघडलेले किंवा खराब झालेले मोबाइल फोन्स, लॅपटॉप, टेलिव्हिजन संच, आणि कॉम्प्युटर्स यांसारख्या वस्तूंमुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत. गंभीर आजारांचे स्रोत बनलेल्या या ई-कचर्‍याचे भारतासारख्या विकसनशील देशांत बरेच जास्त प्रमाण आहे.

सरकारी आकडेवारीनुसार भारतात २००४मध्ये १,४६,८०० टन इतका ई-कचरा होता. २०१२मध्ये तो वाढून ८,००,००० टन झाला असल्याचे अनुमान आहे. ई-कचरा निर्माण करणार्‍या देशातील प्रमुख शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, बंगलोर, कलकत्ता, चेन्नई आणि हैदराबाद या महानगरांचा आणि पुण्यासारख्या आयटी क्षेत्राशी संबंधित शहरांचा समावेश आहे.

ई-कचरा हा आयटी कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावर निघतो. पूर्वी मोठ्या आकाराचे कॉम्प्युटर आणि मॉनिटर असायचे. आता त्यांची जागा स्लिम कॅबिनेट आणि फ्लॅट मॉनिटर्सनी घेतली आहे. माउस, की-बोर्ड, मोबाइलचे खराब झालेले स्पेअर पार्ट किंवा सध्याच्या स्थितीत न चालणारी उपकरणे ही ‘ई-कचरा’कचरा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.techgib.com/e-waste/|शीर्षक=What is E-Waste? What Happens to E-Waste? -|दिनांक=2018-08-17|संकेतस्थळ=Tech Gib|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-07-07}}</ref>’ या प्रकारात येतात. जुन्या डिझाइन्सचे कॉम्प्युटर, मोबाइल फोन, टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, क्षमता संपलेले सेल आणि अन्य उपकरणे हासुद्धा ई-कचराच. त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

आपण आपल्या घरातील टाकाऊ वस्तू, कचरा नेहमीच घराबाहेर फेकून देतो. सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, अगदी कुठेही आपण कचरा फेकतो. या कचर्‍यात ई-कचराही असतो. मात्र त्याबद्दल आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही किंवा दंडही करत नाही.

वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ई-कचर्‍याचे व्यवस्थापन करुन तो नष्ट करण्यासाठी २००८मध्ये काही नियम बनवले होते. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात (?) वन आणि पर्यावरण मंत्रालयाने ई-वेस्ट मॅनेजमेंट ॲन्ड हँडलिंग कायद्याची अधिसूचना मांडली होती. तिच्या संदर्भात संबंधित व्यावसायिक आणि ग्राहक यांना माहिती देण्यासाठी एक वर्ष वेळ देण्यात आला होता.

"https://mr.wikipedia.org/wiki/ई-कचरा" पासून हुडकले