"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कथासूत्र: आवश्यक सुधारणा
→‎कालिदास जयंती: संदर्भरहित मजकूर काढला
ओळ ८:
मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्ष कुबेराचा एक सेवक होता. आपल्या पत्नीच्या सहवासात रमल्याने नेमून दिलेल्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरी' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्‍नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून आल्या . त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून आपल्या पत्‍नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=tyX2DAAAQBAJ&pg=PT50&dq=MEGHDOOT+STORY&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjFp_eZmZjjAhX16XMBHfDzAsIQ6AEILTAB#v=onepage&q=MEGHDOOT%20STORY&f=false|title=The Story of Kalidas|last=Shailesh|first=H. D. Bhatt|publisher=Publications Division Ministry of Information & Broadcasting|isbn=9788123021935|language=en}}</ref>.
प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणार्‍या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात आली आहे.<ref>संपादक: प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांचे संपादकीय निवेदन (महाकवि श्रीकालिदासविरचित 'मेघदूत' (१९३५) भाषान्तरकार :रामचंद्र गणेश पाटील) </ref>
 
== कालिदास जयंती ==
कालिदासाचा जन्म नेमका कोणत्या दिवशी झाली ते माहीत नाही. परंतु ’मेघदूत’ काव्याची सुरुवात ज्या ’आषाढस्य प्रथमदिवसे’ या शब्दांनी होतो त्याची आठवण म्हणून कालिदासाचा जन्म आषाढ शुद्ध प्रतिपदेला झाला असे मानले जाते. त्यामुळे, कालिदासाची जयंती आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी होते. या दिवशी कालिदासाच्या वाङ्मयावर आधारलेले कार्यक्रम होतात.
 
== मेघदूतावरील प्रसिद्ध टीकाग्रंथकार ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले