"वामन पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Reverted 1 edit by 47.247.51.30 (talk) to last revision by QueerEcofeminist. (TW)
खूणपताका: उलटविले
QueerEcofeminist (चर्चा)यांची आवृत्ती 1688401 परतवली.
खूणपताका: उलटविले संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
ओळ ७:
==वामन नरहरी शेष==
यांचा जन्म [[नांदेड]]चा समजला जातो<ref name=":0" />. मूळ विजापूरचे रहिवासी.<ref name=":1" /> यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई. लहानपणापासून विद्याव्यासंगी व बुद्धिमान होते असे म्हणतात. लहानपणीच फारशी भाषेचा अभ्यास केला होता. यांनी काही दिवस विजापूरच्या दरबारी काढले. पण जेव्हा विजापूरच्या बादशहास त्यांना बाटवावे असे वाटले तेव्हा विजापूर सोडले. <ref name=":1" /> उदरनिर्वाहाकरिता काही दिवस भिक्षावृत्तीवर ठिकठिकाणी हिंडून पुढे काशीक्षेत्री प्रयाण केले. तेथे एका मध्वमतानुयायी गुरूजवळ वेद व शास्त्रे यांचा उत्तम अभ्यास केला. या विद्येच्या जोरावर ठिकठिकाणी पूर्वपक्ष व उत्तरपक्ष करून अनेक सभा जिंकल्या व विजयपत्रे मिळविली. वामन पंडित प्रथमतः द्वैतमतवादी असले, तरी त्यांच्या मनाचे त्या विचारसरणीने समाधान होईना. त्यामुळे त्यांनी निरनिराळया मतांच्या ग्रंथांचे अवलोकन करून अनेक शास्त्रीपंडितांच्या गाठीही घेतल्या, परंतु मनाचे समाधान झाले नसल्याने निराशेने कंटाळून शेवटी आत्मत्यागाच्या विचारापर्यंत त्यांची मजल गेली होती. ते पुढे मलयाचल पर्वताकडे गेले. तेथे त्यांना एका यतीने गुरूपदेश दिला. ही हकीकत त्याने 'निगमसागर' नांवाच्या ग्रंथात आरंभी विस्ताराने दिली आहे. निगमसागर ग्रंथ शके १५९५ साली लिहिल्याचा त्या ग्रंथातच उल्लेख आहे.

==वामन पंडिताचे काव्य==
{{विकिकरण}}
महाराष्ट्रीय ज्ञानकोशानुसार वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते. वामन पंडितांची कांहीं काव्ये भाषांतररूप आहेत व काही स्वतंत्र. भर्तृहरीची श्रृंगार, नीति, वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होय. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 'यथार्थदीपिका' या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहास्तव लिहिली. तीत ’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ असे प्रतिपादिले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठे लांब तर कोठे आखूड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवध, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशी इतर पुराणप्रसंगांवर वामन पंडितांनी काव्ये केली आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असे मोरोपंतांनी म्हटले आहे, यावरून वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांप्रमाणेच वामन पंडितांनी शृंगार, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्येही केली आहेत. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रासाद याच्या काव्यांत जागजागी दिसून येतो. आपल्या पत्नीस उपदेश करण्याकरिता लिहिलेले प्रियसुधा नावाचे प्रकरण फार उत्तम वठले आहे. <ref name=":1" />

विनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना

विना मृत्तिका कुंभ कांहीं असेना

दिसेना असी ज्याविणें मृत्तिकाही

नसे मृत्तिकाही तयावीण कांहीं ॥१॥

अलंकार सृष्टीमधें काय आहे

सुवर्णाविणें हें विचारुनि पाहें .. [[:s:चित्सुधा|चित्सुधा]]

==उत्तरकालीन टीका==