"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
→‎अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण: Alexander was not the great for Hindustan. He failed to capture Hindustan as he announced earlier. He was almost killed by Hindustani archer when he was running from Hindustan. After he died in BC 323, all his garrisons were killed and the traces of his rule were destroyed in just 6 months!!!
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
 
== अलेक्झांडरचे भारतावर आक्रमण ==
[[अलेक्झांडर द ग्रेट]]चे भारतावरील आक्रमण चाणक्याच्या आयुष्यात मोठी उलाढाल करून गेले. अलेक्झांडरच्या आक्रमणाचा सामना फक्त भारतीय राज्यांची एकत्र सेनाच करू शकेल असा विश्वास विष्णुगुप्ताला होता, त्यामुळे चाणक्याने विविध राज्यांच्या राज्यकर्त्यांना एकत्र लढण्याचे आवाहन केले. परंतु सुरुवातीलाच तक्षशिलेचा राजकुमार आंभी याने अलेक्झांडरकडे मैत्रीचा हात पुढे केला. परंतु विविध राज्यांचे व जनपदांचे एकमेकांशी हेवेदावे व संघर्षांमध्ये अडकलेल्या राज्यांना एकत्र करून अलेक्झांडरविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्यात चाणक्यला अपयश आले. उलट आंभीने अलेक्झांडरबरोबर युती करून [[पोरस]]विरुद्ध लढण्यास मदत केली. अलेक्झांडरने पोरसचा [[झेलम नदी]]च्या किनारी झालेल्या लढाईत पराभव केला. चाणक्याने या काळात [[मगध]] साम्राज्यालाही अलेक्झांडरविरुद्ध इतर राज्याशी युती करून लढण्यास विनंती केली व भारताला पारतंत्र्यापासून वाचवण्याचा आग्रह धरला. परंतु चाणक्याचा अपमान करून त्याची विनंती धुडकावून लावण्यात आली. जोवर या अपमानाचा बदला घेणार नाही तोवर आपली शेंडी बांधणार नाही अशी चाणक्याने प्रतिज्ञा घेतली होती अशी कथा प्रसिद्ध आहे. अलेक्झांडरच्या सैन्यामध्ये इतर भारतीय राज्यांच्या सामर्थ्याबद्दलच्या कहाण्या ऐकून त्याच्या सैन्यामध्ये दुफळी माजली व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी त्याने [[मॅसेडोनिया]]ला परतण्याचा निर्णय घेतला व काही काळातच अलेक्झांडरने भारतातून माघार घेतली. माघार घेतली तरी जिंकलेला प्रदेश अलेक्झांडरच्या नियंत्रणात रहावा म्हणून या राज्यांवर क्षत्रपांची नेमणूक केली होती त्यामुळे पश्चिम व वायव्य भागावर ग्रीक सत्ताच होती.
 
=== ग्रीक सत्तेविरुद्ध युद्ध ===
"https://mr.wikipedia.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले