"सांगली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५६:
सांगली हे मुंबई पासून ३९० किमी व बंगलोरपासून ७०० किमी आणि कोल्हापूर पासून ५० किमी अंतरावरील एक प्रमुख शहर आहे.
 
कृष्णा नदीच्या काठावर वसलेले सांगली [[हळद]] व्यापार आणि साखर कारखाने यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच [[द्राक्ष]] आणि [[बेदाणा]] उत्पादनात आघाडीवर आहे. सांगली एक प्रमुख शिक्षण आणि आरोग्य केंद्र देखील आहे. विष्णुदास भावे ह्यांचं पहिलं नाटक एकंदरीत, महाराष्ट्रातील पहिलं नाटक '''सीता स्वयंवर''' हे येथील '''पटवर्धन संस्थान''' च्या राजवाड्यात प्रथम इ. स. १८४२ सांगली सादर करण्यात आलं त्यामुळे '''नाट्यपंढरी''' अशी देखील सांगली शहराची ओळख आहे. सांगली जवळ कृष्णा नदीच्या खोऱ्यात पर्यटन स्थळांची विविध ठिकाणे आहेत.
 
प्राचीन काळामध्ये, सांगलीचा प्रदेश कुंडल म्हणून ओळखला जात होता. या भागावर राज्य करणाऱ्या चालुक्य घराण्याची राजधानी होती. स्वातंत्र्यपूर्व काळात, सांगली हे पटवर्धन राजघराण्यातील एक राज्य होते. १९४८मध्ये, सांगली भारताच्या प्रजासत्ताकामध्ये विलीन करण्यात आले. सांगली ही भारतात हळद व्यापार राजधानी आहे. येथे साखर उद्योग लॉबी आहे. सांगली शहरात वसंतदादा साखर कारखाना हा आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे. सांगली द्राक्षांसाठीदेखील प्रसिद्ध आहे.
 
सांगलीत अनेक औद्योगिक वसाहती आहेत. सांगली-मिरज एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र ही सुनियोजित औद्योगिक वसाहत आहे . या औद्योगिक क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक ग्रीन हाऊस, हेल्थ क्लब, जलतरण तलाव, सॉफ्टवेअर प्रशिक्षण केंद्र, इत्यादी सोयी आहेत. नव्या दळणवळणाच्या माध्यमातून आणखी मोठे उद्योग शहरात आणि जिल्ह्यात आणण्यासाठी [[महाराष्ट्र शासन]] प्रयत्नशील आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सांगली" पासून हुडकले