"गुवाहाटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २४:
|longd = 91 |longm = 44 |longs = |longEW = E
}}
'''गुवाहाटी''' ([[आसामी भाषा|आसामी]] : গুৱাহাটী; मराठीत [[गोहत्ती]] - Gauhati; प्राचीन नाव - प्राग्‌ज्योतिषपूर) हे [[भारत]] देशाच्या [[आसाम]] राज्याच्या राजधानीचे शहर व [[ईशान्य भारत]]ामधील सर्वाधिक लोकसंख्येचे महानगर आहे. गुवाहाटी शहर आसामच्या मध्य-पश्चिम भागात [[ब्रह्मपुत्रा नदी]]च्या दक्षिण काठावर वसले आहे. २०११ साली येथील लोकसंख्या ९.६ लाख इतकी होती. ''प्रगज्योतिषपुरा'' ह्या नावाने प्रचलित असलेले गुवाहाटी ऐतिहासिक [[कामरुप]] राजतंत्राची राजधानी होती. आजच्या घटकेला गुवाहाटीमध्ये अनेक जुनी हिंदू मंदिरे आहेत. गुवाहाटी आसामचे शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र असून [[दिसपूर]] ह्या गुवाहाटीच्या एक भागामध्ये आसाम राज्य सरकारचे कार्यालय व [[आसाम विधानसभा|विधानसभा]] स्थित आहे. [[गुवाहाटी उच्च न्यायालय]] आसामसोबतच [[नागालँड]], [[मिझोराम]] व [[अरुणाचल प्रदेश]] ह्या राज्यांसाठी देखील जबाबदार आहे.
 
इसवी सन १९८३मध्ये शहराचे [[गोहत्ती]] (Gauhati) हे परंपरागत नाव बदलून गुवाहाटी करण्यात आले.
 
==इतिहास==
अनेक शतकांचा इतिहास असलेल्या गोहत्तीचा उल्लेख पुराणामध्ये आढळतो. येथील [[कामाख्यकामाख्या मंदिर]] अनेक शतके जुने आहे. [[आहोम साम्राज्य]]ाचा भाग राहिलेल्या गुवाहाटीवर मुघलांची अनेकदा आक्रमणे झाली. १६७१ सालच्या सराईघाट लढाईला गोहत्तीच्या इतिहासात मानाचे स्थान आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या व नंतरच्या काळात गोहत्तीत व परिसरात फारशा उल्लेखनीय घटना घडल्या नसल्यामुळे शहराच्या इतिहासाची केवळ मर्यादित नोंद आढळते.
 
==भूगोल==
Line ३३ ⟶ ३५:
 
==शिक्षण==
गुवाहाटीच्या उत्तर भागात असलेली 'गोहत्ती आयआयटी' [[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान गुवाहाटी]] ही भारतामधील सर्वोत्तम तांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. आय.आय.टी. गुवाहाटीचा परिसर गुवाहाटीच्या उत्तर भागात स्थित आहे. ह्याच बरोबर कॉटन कॉलेज, गुवाहाटीगोहत्ती विद्यापीठ '''(गुवाहाटी नाही!!)''', आसाम विज्ञान व तांत्रिकी विद्यापीठ इत्यादी अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था गुवाहाटीमध्ये आहेत.
 
==खेळ==
[[नेहरू स्टेडियम, गुवाहाटी|नेहरू स्टेडियम]] हे गुवाहाटीमधील प्रमुख स्टेडियम असून येथे [[क्रिकेट]] व [[फुटबॉल]] ह्या खेळांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातात. येथील [[इंदिरा गांधी ॲथलेटिक स्टेडियम]] २००७ राष्ट्रीय क्रिडाकीरिडा स्पर्धांसाठी बांधले गेले व आजच्या घडीला प्रामुख्याने फुटबॉलसाठी वापरले जाते. [[२०१७ फिफा अंडर-१७ विश्वचषक]] स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या ६ यजमान शहरांपैकी गुवाहाटी एक होते. येथे अनेक साखळी व बाद फेरीचे सामने खेळवले गेले. [[इंडियन सुपर लीग]] स्पर्धेत खेळणारा [[नॉर्थईस्ट युनायटेड एफ.सी.]] हा फुटबॉल क्लब गुवाहाटीमध्येच स्थितगुवाहाटीमध्ये आहे.
 
==वाहतूक==
गोहत्ती विमानतळ (बदलेले नाव - [[लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ]]) हा पूर्वोत्तरईशान्य भारतातील सर्वाधिक वर्दळीचावाहतुकीचा विमानतळ असून देशांतर्गत सेवेसोबत येथून [[बँकॉक]] व [[भूतान]]साठी देखील थेट प्रवासी विमानसेवाविमाने उपलब्ध आहेआहेत. [[गुवाहाटी रेल्वे स्थानक]] [[उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्र]]ाचे मुख्यालय असून ते देशातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे.
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/गुवाहाटी" पासून हुडकले