"पंचांग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १४४:
 
नक्षत्रातल्या ताऱ्यांनी व्पापलेली आकाशातली जागा आणि ३० अंश आकाशाने व्यापलेली जागा तंतोतंत समान नसते. त्यामुळे नक्षत्राचे काही तारे राशीच्या बाहेर राहिलेले असू शकतात किंवा नक्षत्राच्या ताऱ्यांनी व्यापूनही राशीची थोडीफार जागा रिकामी असू शकते.
 
==अधिक माहिती==
बृहत्संहितेत नक्षत्रांचे त्यांच्या गुणांवरून ध्रुव, तीक्ष्ण, चर, मृदु, लघु, उग्र व मृदुतीक्ष्ण असे ७ गट पाडले आहेत. यांशिवाय अधोमुख, ऊर्ध्वमुख, तिर्यङ्‌मुख, अंध, मंदाक्ष, मध्याक्ष व सुलोचन असेही नक्षत्रांचे प्रकार मानले आहेत.
 
मृग, चित्रा आणि घनिष्ठा या नक्षत्रांना द्विपाद नक्षत्रे म्हणतात. भद्रा तिथीला यांपैकी एखादे नक्षत्र असेल तर द्विपुष्कर योग होतो. द्विपाद नक्षत्राचे दोन पाय एका राशीत आणि उरलेले दोन पाय पुढल्या राशीत असतात.
 
कृत्तिका, पुनर्वसु, पूर्वा(फाल्गुनी), उत्तराषाढा आणि पूर्वा भाद्रपदा या नक्षत्रांचे तीन पाय एका राशीत आणि चौथा पाय वेगळ्या राशीत असतो म्हणून यांना त्रिपाद नक्षत्रे म्हणतात. ज्या दिवशी भद्रा तिथी, अधिक मंगळवार, शनिवार किंवा रविवार यांपैकी एक वार व एखादे त्रिपाद नक्षत्र असेल तर त्रिपुष्कर योग होतो.
 
==योग==
"https://mr.wikipedia.org/wiki/पंचांग" पासून हुडकले