"विद्याधर गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
ओळ २:
 
== '''इतिहास''' ==
संपादकीय सूत्रे हाती येण्यापूर्वी विद्याधर गोखले यांच्याकडे ‘साप्ताहिक लोकसत्ते’ ची पूर्ण जबाबदारी होती. ह.रा.महाजनी संपादक असताना गोखले ‘लोकसत्ता’ मध्ये आले. त्याआधी काही काळ त्यांनी भा.रा.धुरंधर यांच्या ‘नवभारत’ मध्ये काम केले होते.अमरावती होऊनही मुंबईत आल्यावर काही काळ ते शिक्षक म्हणूनही काम करत होते. तरी त्यांच्यावरील संस्कार हे पत्रकारिता यालाच पोषक होते. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे काँग्रेसचे नेते होते. विद्येवर,ज्ञानावर त्यांचा विश्वास होता.ते व्यासंगी होते. हाच संस्कार विद्याधर गोखले यांवरही झाला. वीर वामनराव जोशी यांचा सहवासही त्यांना अमरावतीत लाभला होता व जोशी यांच्या ‘सावधान’ पत्राचे ते चाहते होते. न. चि. केळकर, अच्युत बळवंत कोल्हटकर,शि.म. परांजपे यांच्या लेखनाचा त्यांनी खास अभ्यास केला होता. संपादकीय लेखनाचे धडे त्यांनी महाजनी यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. प्रत्यक्ष संपादकीय लेखनही त्यांनी विपुल केले. त्यामुळे संपादकाची जबाबदारी विद्याधर गोखले यांनी अगदी सहजपणे स्वीकारली.
 
==प्रकाशित साहित्य==