"ह.रा. महाजनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: हणमंत रामचंद्र महाजनी {१९०७-१९६९} प्रस्तावना- एक जून १९०७ रोजी जन...
(काही फरक नाही)

१५:५६, ३ मे २०१९ ची आवृत्ती

हणमंत रामचंद्र महाजनी {१९०७-१९६९} प्रस्तावना- एक जून १९०७ रोजी जन्मलेले हणमंत रामचंद्र महाजनी हे समाजवादी विचारसरणीचे पत्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसत्ताचे संपादक म्हणून ह. रा. महाजनी यांची कारकीर्द दीर्घ म्हणजे तब्बल सतरा वर्षाची ठरली.स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भाग घेतला होता. मानवेंद्रनाथ रॉय यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. सहसंपादकपदी निवड झाल्यानंतर दोन वर्षातच ते लोकसत्ता चे संपादक झाले. कार्यक्षम वितरण व्यवस्था व शब्दकोड्यांची लोकप्रियता या झोडीला महाजनी यांच्या संपादकीय कर्तुत्वालाहि या यशाचे मोठे श्रेय जाते. आपल्या लेखन आणि संपादकीय कौश्यल्याने महाजनी यांनी लोकसत्ता ला आघाडी मिळवून दिली. महाजनी यांच्या लेखणीत वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य होते. पण केवळ त्यांच्या लेखनामुळे पत्र लोकप्रिय झाले नाही. त्यांच्या संपादकीय कौशल्याच्याही त्याला हातभार लागला. ताज्या, वेगळे बातम्या, नेटके संपादन, आकर्षण-अर्थपूर्ण शीर्षके या सगळ्यावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. जिल्ह्यांच्या बातम्यापासून पत्रव्यवहारपर्यंत सर्व गोष्टींवर त्यांचे लक्ष असे. पत्राची साप्ताहिक आवृत्ती बोजड होऊ नये. त्यात उपयुक्त माहिती असावी पण त्याच बरोबर त्यांचे लक्ष असे.

                     महाजनी यांचे शिक्षण जुन्या पठडीतील शास्त्रांप्रमाणे झाले होते. त्यांचा संस्कृतचाही अभ्यास होता. त्यामुळे त्यांचे लेखन भारदस्त होई. काही काळ त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले. पण भाषा शिक्षकी स्वरुपाची नव्हती. विषय रंजक कसा करावा याची त्यांना जाण होती. त्यांचे लिखाण तर्ककर्कश असले तरी ते धारदार व खोचाकही असे. शी. म. परांजप्यांची वक्रोक्ती व काव्यमयता, ण. ची. केळकरांची रसिकता, लोकमान्य टिळकांचा रोखठोकपणा व आवेश या लेखाणगुणांचे संस्कार महाजनींवर झाले होते. रविवारची चिंतनिका, संगीत शाकुंतल, परी तू जागा चुकलासी, गुन्हेगाराची कैफियत, ईश्वराची आत्महत्या, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. १८ ऑगस्ट १९६९ रोजी त्यांचं निधन झालं.