"वेदनेच्या तळाशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
ओळ १:
{{पुनर्लेखन}}
'वेदनेच्या तळाशी...' ( प्र.आ. २०१९ ; सृजन प्रकाशन, मुंबई) हा कवी प्रभाकर गंभीर यांचा कवितासंग्रह आहे. परिवर्तनवादी व्यवहाराशी बांधिलकी मानणाऱ्या अस्वस्थ कार्यकर्त्याच्या जाणिवांची विविध काव्यरूपे त्यातून प्रकर्षाने व्यक्त होतात. दलित जीवनातील बदलत्या अनुभूतींची अनेक शब्दरूपे त्यातून पुढे येतात जगभरातील सर्वहारा वर्गाच्या व्यथा, वेदना आणि विद्रोहाच्या जाणिवाही त्यातून प्रत्ययकारकतेने अभिव्यक्त होतात. आंबेडकरी विचारधारेच्या वैश्विक मूल्यांचे अंगभूत वैशिष्टये अंगी बाणवलेली ही कविता समकालीन जातवर्गीय वास्तवाची विवेकनिष्ठ चिकित्सा करते. तिची ही वैशिष्टयपूर्णत: जागतिकीकरणोत्तर काळातील शोषितांच्या विस्तारित रूपाचे तीव्रतेने अधोरेखन करते. सोबतच या शोषित विस्तारीत समूहाच्या नवप्रबोधानावर भर देते.
 
कवी प्रभाकर गंभीर हे समूहाच्या अभिव्यक्तीतच आपल्या अभिव्यक्तीचे सौंदर्यमूल्य शोधतात. आपले अस्तित्व हे समष्टीच्या अस्तित्वाचा एक भाग आहे, याच जाणीवेतून ते समूहाच्या सांघिक सर्जनाचा कालसुसंगत पुनर्विचार मांडतात. यांसदर्भात ते त्यांचे म्हणणे असे, "कविता ही एक जोखीम आहे, त्यात दलित कविता ही एक मोठी जोखीम आहे. संख्यात्मकदृष्टया एक मोठं राष्ट्र सामावणारं दलितांचं जग आणि त्यांच्या जगण्याच्या बेरकेपणाची आगळीवेगळी वैशिष्टये भारतीय उपखंडात अजूनही कायम असून व्यापक सांस्कृतिक चळवळीच्या उभारणीच्या गरजेसोबतच एका विश्वव्यापी कला-साहित्य निर्मितीची ती मोठी उगमस्थाने आहेत, असे मला वाटते. व्यवस्थेने बहाल केलेल्या प्रचंड अभावग्रस्ततेतही आपल्या पावल्याएवढया भूमीवर भक्कमपणे पाय रोवून आणि सतत संघर्षरत राहून उद्याच्या पहाटेची स्वप्ने पाहत पाहत जगाला जीवनजगण्याची आगळीवेगळी कला शिकवणाऱ्या दलितांच हे जग साहित्यकलाक्षेत्रातील कलावंत - विचारवंत - बुद्धिवंतांकरिता आजच्या वर्तमानातही एका वेगळ्या प्रतिभासंवर्धनासाठी एक मौलिक उपलब्धी ठरावी असंच आहे, असे मला वाटते." (पृ. क्र. ३३-३४) कवीची ही भूमिका आपल्या पूर्वसुरींच्या सांस्कृतिक सचितांची बदलत्या सामाजिक परिप्रेक्ष्यातील नवी अभिव्यक्ती जाणवते. कवीची असे भूमिका हे घेणे समकालीन मराठी कवितेतील विरळ होणाऱ्या स्वराची नवी गर्जना जाणवते. कवी ज्या दलित जीवन जाणिवांची प्रस्तुत विधानात चर्चा करतात, ते जीवन खचितच खेडयांमधील व शहरांमधील अभावग्रस्त दलित आणि वंचितांच्या जगातील आहे. वेदनेच्या या तळाशी कवीची असणारी बांधलकीच कवीच्या संवेदनविश्वाला व्यापून आहे. पायाभूत सुविधांच्या अभावात खितपत पडलेल्या वर्गाच्या वेदना कवी अधिक महत्त्वाच्या वाटतात. या दृष्टीने कवितासंग्रहाचे 'वेदनेच्या तळाशी...' हे शीर्षक अधिक समर्पक जाणवते.
 
जेष्ठ समीक्षक डॉ. युवराज सोनटक्के यांनी या कवितासंग्राहावर भाष्य करताना असे म्हटले आहे, की " ' वेदनेच्या तळाशी ' या कवितासंग्रहात आक्रोश, तणाव व संघर्षाच्या विविध सोपनांचे रूपांकन झालेले दिसते. सामाजिक जीवनाच्या काळोखाला उदघटित करताना प्रभाकर गंभीर आपल्या कवितेत पूर्ण अस्वस्थतेने व आवेगाने अपेक्षित स्फोटाची बाब उघडपणे सांगतात. त्यांची मान्यता आहे की संघर्ष स्वत:च एक सार्थकता आहे. अत्याचार, अन्याय व शोषणाच्या भिंती तोडणे हे त्याचे साध्य आहे. कवी क्रांती आणि परिवर्तनांच्या स्वरांद्वारे या भिंतीनाच नव्हे तर पायालाही हादरे देऊ इच्छितो. कवीचा हेतू शब्दांचे जाळे पसरून शब्देतिहास घडविणे नाही, तर समाजाचा चेहरा बदलणे आहे.म्हणून या कवितेत जनक्रांतीचे प्रबळ स्वर ध्वनित व प्रतिध्वनित होताना दिसतात. या कवीने वैचारिकता व विद्रोहाच्या चिंतनाला आपल्या कवितेत गांभीर्याने, गहनतेने व योजनाबद्ध रीतीने मांडले आहे. (पृ. क्र. १४)
या कवितासंग्रहातील कविता विविध विषयांवरील आहे. तर काही कविता या अनेक विषयांवर मार्मिक राजकीय भाष्य करणाऱ्या आहेत. माय , मला आहे अभिमान माझ्या पूर्वपिढीचा , हे क्रांतिच्या माये ! , तुझा जन्मोत्सव साजरा करताना, सूर्यकुलाचे सारथी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर : URGR FOR COMPASSION , रमाई , हे माझ्या प्रिय देशा ! , ज्यानबा वल्द राघोजी... , आदिवासी बनाम वनवासी , काउंटरींग कास्ट इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण आहे. काही कवितांमधील काही ओळी खालील दिलेल्या आहेत. त्यांवरून कवितेचे प्रातिनिधिक स्वरूप लक्षात येण्यास मदत होईल.
 
Line १४ ⟶ १५:
 
 
यांसारख्या अनेक महत्त्वाच्या ओळींनी कवितासंग्रह अधिक लक्षणीय बनला आहे. जातिव्यवस्था ही केवळ दलितांच्या जीवनाला घेरून असणारी समस्या नसून ती शुद्रातिशूद्रांच्या पर्यायाने संपूर्ण भारतीय समाजाच्या अधोगतीचे प्रमुख कारण आहे. तिच्या निर्मूलनाचा क्रांतिकारक विचार प्रभाकर गंभीर प्रभावीपणे मांडतात. म्हणून त्यांच्या कवितेत शेतकरी, भटके-विमुक्त, कष्टकरी यांच्या मुक्तीचा विचार प्रकर्षाने व्यक्त होते. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे असे हे विश्वव्यापक रूप कवी प्रभाकर गंभीर आपल्या कवितेतून उभे केले आहे.
 
त्यातील प्रतिमा आणि प्रतीके प्रभावी आहेत. सूर्यकुळाशी नाते सांगणारी त्यांची प्रतिमासृष्टी प्रयोगशीलतेला प्राधान्य देते. त्यामुळे त्यात नाविन्य आहे. प्रतिमांचे हे जग दुर्बोधतेतून गूढगम्य होणे टाळते. तिच्यातील सामाजिक बांधिलकीचे भान तीव्र असल्याने त्यात अर्थप्रवाहीपणाला विशेष महत्त्व आहे. समकालीन मराठी कवितेत या कवितासंग्रहाचे वाड्मयीन मूल्य अतिशय महत्त्वाचं आहे. त्यातील काव्यगुण वैचारिक सामर्थ्य तसे समकालीन कवितेत दुर्मिळच जाणवते.