"हरी नारायण आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३७:
 
== प्रकाशित साहित्य ==
आपटे अर्वाचीन [[मराठी]] कादंबरीचे [[जनक]] मानले जातात. त्यांच्या लिखाणावर [[महादेव गोविंद रानडे]], [[गोपाळ कृष्ण गोखले]] प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबऱ्या लिहिणाऱ्या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ [[युग]] म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. ''धूर्तविलसत'', ''मारून मुटकून [[वैद्य]]बुवा'' व ''जबरीचा [[विवाह]]'' ही फ्रेन्च नाटककार [[मोलियर]]च्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, ''जयध्वज'' (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), ''श्रुतकीर्तचरित'' (कॉग्रेव्हचेकाँग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राईड’) व ''सुमतिविजय'' ([[शेक्सपियर|शेक्सपियरचे]] ’मेझर फॉर मेझर’) ही [[रूपांतरित नाटके]] आहेत. त्यांनी [[मुंबई]] मराठी [[ग्रंथ]] संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबऱ्यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. ''बिचारा'' या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१च्या [[केसरी (वृत्तपत्र)|केसरीच्या]] अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. [[निबंध]]कार [[चिपळूण]]कर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती.
 
{| class="wikitable sortable"