"सविता आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २९:
 
==सुरुवातीचे जीवन व शिक्षण==
सविता आंबेडकर यांचा जन्म [[२७ जानेवारी]] [[इ.स. १९०९]] रोजी [[पुणे|पुण्यातील]] एका [[सारस्वत ब्राह्मण]] कुटुंबात झाला. त्यांचे माहेरचे नाव शारदा कबीर होते. त्यांचे घराणे [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्यातील [[राजापूर]] तालुक्यातील दोरला गावचे होते. त्यांचे वडील कृष्णराव कबीर इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. कृष्णरावांना पाच मुली व तीन मुलगे होती. या एकूण आठ मुलांपैकी ६ भावंडांचा विवाह आंतरजातीय झाला, इतके ते त्या काळातही पुरोगामी विचाराचे होते. याबद्दल माईसाहेबांना मोठा अभिमान वाटे.<ref>https://m.patrika.com/noida-news/why-there-was-anger-over-baba-saheb-dr-bhimrao-ambedkar-s-second-marriage-news-in-hindi-1553264/</ref>
 
शारदा ह्या विद्यार्थीदशेत अत्यंत हुशार होत्या. त्यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात घेतले व नंतर [[मुंबई]]च्या [[ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज]]मधून डॉक्टरीसाठीची [[एम.बी.बी.एस]] ही पदवी मिळवली. त्या महाविद्यालयाच्या वसतिगृहात असतांना अभ्यास नि आपण एवढीच त्यांची दिनचर्य होती. या वसतिगृहासमोरच असलेल्या ‘मणिभवन’ येथे १४ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांची [[महात्मा गांधी]]शी मोठी खडाजंगी झाली होती. पण त्या भेटीसंबंधी त्यांना वसतिगृहात असूनही काहीच माहिती नव्हती. त्यांचे [[एम.डी.]]च्या परीक्षेचे पेपर्स अत्युत्तम गेले. पण ऐन प्रॅक्टिकल परिक्षेच्या वेळी त्या टाईफाईड, डिहायड्रेशन, बॉईल्स अशा आजाराने खिळल्या व एम.डी. राहून गेले. याच काळाच त्यांनी वैचारिक पुस्तकांचे वाचन केले.