"मधुमालती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अमराठी मजकूर दृश्य संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १०:
मधुमालतीला वर्षभर तुरळक फुले येतात पण मुख्य बहर उन्हाळ्यात असतो . फुले फांदीच्या टोकावर गुच्छाने येतात आणि झाडावर दोन तीन दिवस टिकतात. मधुमालतीच्या फुलांना गोलाकार पाच पाकळ्या आणि हिरवा लांब देठ असतो. फुलांची लांबी अडीच ते तीन सें मी असते. फुले रात्री उमलतात. उमलताना त्यांचा  रंग पांढरा असतो पण हळूहळू एक दोन दिवसात तो बदलत बदलत फिकट गुलाबी, गुलाबी आणि शेवटी तांबडा होतो. त्यामुळे झाडावर एकच वेळी पांढरी, फिकट गुलाबी, गुलाबी आणि तांबडी फुले दिसतात आणि असा बहरलेला वेल बहुरंगी दिसतो. सुरुवातीस फुले आडवी असतात पण नंतर ती जमिनीकडे झुकतात. फुलांचे परागीभवन कीटकांद्वारे व पक्षांद्वारे  होते. वेगवेगळ्या रंगांच्या फुलामुळे वेगवेगळे कीटक व पक्षी फुलांकडे आकर्षित होतात. फुले सुवासिक असतात आणि त्यांचा आसमंतात दरवळणारा सुगंध दूरवरही जाणवतो.
 
फुले गळून पडल्यावर त्याजागी फळे येतात. मात्र महाराष्ट्रात ह्या झाडाला फळे आलेली क्वचितच पाहायला मिळतात<ref name=":0" />. त्यामुळे बियांमुळे नवीन झाड तयार करता येत असले तरी महाराष्ट्रात मात्र फांदीपासून छाट कलमाने नवीन रोपे तयार केली जातात. ह्या झाडाच्या मुळाला नवीन फुटवे येतात ते तेथून काढून दुसरीकडे लावल्यास नवीन झाड तयार होऊ शकते. ही फळे चीन इंडोनेशिया अशा काही देशात औषधी समजली जातात.<ref name=":0" />
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/मधुमालती" पासून हुडकले