"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ४:
'''अगस्त्य महर्षी''' (नामभेद: '''अगस्त्य''', '''मैत्रावरुणी''', '''अगस्ति''';) हे वेद वाङ्‌मयामध्ये वर्णिलेले ‘मंत्रद्रष्टा महर्षी’ होत. ते शिवपुत्र कार्तिकेयाचे आद्य शिष्य तथा दाक्षिणात्य भक्तिपरंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्धपुरुषांच्यापैकी प्रथम सिद्धपुरुष मानले जातात. [[सप्तर्षी|सप्तर्षींपैकी]] मुख्य मानले जाणारे भगवान श्री अगस्त्य [[वसिष्ठ]] ऋषींचे वडील बंधू होत. भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारात भगवान अगस्त्यांचे योगदान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. ‘अगस्त्य’ हे भगवान [[शिव|परमशिवांचे]]देखील एक नांव असल्याने अगस्ती मुनी हे परमशिवस्वरूप असल्याचे मानले जाते. ‘अगस्त्य’ ह्या नांवाव्यतिरिक्त त्यांस तमिऴमुनी, माधवमुनी, महामुनी, कुरुमुनी, तिरुमुनी, बोधीमुनी, अमरमुनी, कुडमुनी, कुंभज, कुंभसंभव, घटोद्भव ही नामाभिधाने प्राप्त आहेत. अशा अगस्त्य महर्षींचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (३००० इ.स.पूर्व) ला काशीमध्ये झाला. मित्रावरुण हे त्यांचे पिता होत. [[ऋग्वेद|ऋग्वेदामध्ये]] (संदर्भ: ७/३३/१३) त्यांच्या जन्मकथेचे वर्णन येते. वर्तमानकाळांत [[काशी|काशीक्षेत्रातील]] त्यांचे जन्मस्थान श्रीअगस्त्यकुंड ह्या नांवाने प्रसिद्ध आहे.
== दक्षिण दिशेस प्रस्थान ==
देवतागणांच्या विनंतीस मान देवूनदेऊन अगस्त्यांनी काशीग्राम सोडून दक्षिण दिशेस प्रस्थान केले आणि नंतर ते दक्षिणेतच स्थायिक झाले. [[आर्यावर्त|आर्यावर्ताच्या]] दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारे ते आद्य वसाहतकार होते, असे मानले जाते. जगप्रसिद्ध ऐतिहासिक महाकाव्ये [[रामायण]] तथा [[महाभारत]] ह्या दोहोंमध्ये महर्षीं अगस्त्यांच्या आयुष्यातील प्रसंगांबद्दल विस्मयकारक आख्यायिका आढळतात. रामायणामध्ये त्रेतायुगात [[राम|प्रभू रामचंद्र]], [[सीता]] आणि [[लक्ष्मण]] वनवासाच्या काळांत वनांत हिंडत असतांना [[नाशिक|नाशिकजवळ]] महर्षींच्या आश्रमात आले आणि त्यांना भेटले अशी एक कथा आहे. त्यावेळी महर्षींनी प्रभु रामचंद्रास ‘विरजा’ नामक शैवदीक्षा दिली, तसेच दक्षिणेत जाऊन लंकापती [[रावण|रावणाचा]] अत्याचार दूर करावयास सुचविले. एवढेच नव्हे तर लंकापतीस वश करून त्याचा अंत करण्याच्या हेतुपूर्तीसाठी अजोड, अमोघ शस्त्रास्त्रांसह कधीही समाप्त न होणाऱ्या बाणांचा भाता दिला. त्यांनीच भगवान प्रभु रामचंद्रास लंकागमनापूर्वी ‘[[आदित्यहृदयम्]]’ स्तोत्र उपदेशिले होते. त्यामुळे प्रभु रामचंद्राचा समरोत्साह दुणावला.
 
== कावेरी नदीची जन्मकथा ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले