"अगस्त्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०:
 
== समुद्रप्राशन, वातापि-इल्वलमर्दन तथा विंध्यपर्वताच्या कथा==
महाभारतात भगवान अगस्त्यांनी केलेल्या समुद्रप्राशनाची कथा आहे. देवासुरयुद्धाच्या वेळी देवांशी वैर धरलेले [[कालकेय]] दानव हे समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर महर्षींनी अख्खा समुद्र पिऊन कालकेयांना ठार मारले आणि देवांवरील संकट निवारले. याबरोबरच त्यांनी नहुषाच्या शापाने विषसर्पस्वरूप झालेल्या [[वातापि]] नामक महादैत्यास भक्षून आपल्या जठराग्नीने पचवून, त्याचा सहोदर [[इल्वल]] ह्यास नेत्राग्नीद्वारा भस्मीकृत केले अशीही कथा आहे. भगवान श्री अगस्त्य महर्षी हे [[विंध्य पर्वत| विंध्य पर्वताचे]] गुरू असल्याचा उल्लेख महाभारतात अन्यत्र आहे. प्राचीन काळी [[मेरु पर्वत]] हा साऱ्या पर्वतांमध्ये उत्तुंग पर्वत म्हणून मान्यताप्राप्त होता. ह्याची उत्तुंगशिखरे पाहून ईर्ष्येने विंध्य पर्वत स्वतःची उंची मेरु पर्वतापेक्षा अधिक करण्याकरिता वाढवू लागला. ह्यामुळे [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] सूर्यगमनामध्ये बाधा येवूनयेऊन काळगणनेमध्ये अंतर पडू लागले. उंचीने सतत वाढत असल्यामुळे विंध्यास गर्व झाला. तेव्हा देवतांनी एकत्र येऊन महर्षींना ‘काहीतरी करा परंतु ह्यातून सोडवा’ अशी प्रार्थना केली. महर्षी दक्षिण दिशेस गमन करीत असताना विंध्य पर्वत त्यांस आडवा आला. गुरुतुल्य महर्षींच्या अद्भुत सिद्धी मनोमन जाणून विंध्य पर्वत त्यांच्यापुढे नमला आणि महर्षींच्या दक्षिणदिग्विजयासाठी त्याने त्यांना मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर महर्षींनी त्यास स्वतः पुनः उत्तर दिशेस परतेस्तोवर जैसा आहे तैसा असण्याची आज्ञा केली. परंतु महर्षी दक्षिणेकडून न परतल्यामुळे विंध्य नेहमीसाठीच विनतावस्थेत राहिला आणि त्याकारणे आर्यावर्ताचा दक्षिणदेशाशी संपर्क स्थापन होवूहोऊ शकला.
 
== विवाह ==
[[मनुस्मृति|मनुस्मृतीच्या]] कथनानुसार साऱ्या [[हिंदु|हिंदुंप्रमाणे]] महर्षींनासुद्धा विवाह करून संततीजनन करण्याची वेळ प्राप्त झाली, तेव्हा घनकीर्तिप्राप्त [[विदर्भ|विदर्भराज]] निमी ह्याची कन्या [[लोपामुद्रा]] ही युक्त वयास प्राप्त झाल्यावर त्यांनी तिच्याशी विवाह करण्यासंबंधी विदर्भराजास विनंती केली. प्रथमत: एका विरागी मनुष्याकडून हे प्रतिपादन ऐकून विदर्भराज खिन्न झाला. परंतु भगवान श्री अगस्त्य महर्षींचे प्रतिभाशाली व्यक्तित्व देखून त्याने ह्या विवाहास मान्यता देवून महर्षींचा लोपामुद्रेशी विवाह लावून दिला. पुढे ह्या दंपतींस [[दृढस्यु]] नावाचा पुत्र झाला. महर्षींच्या लोकोत्तर कार्यामध्ये त्यांची पत्नी लोपामुद्रा ह्यांनीदेखील स्वतंत्र बुद्धीमत्तेने साथ दिल्याचे पुराणांमध्ये आढळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/अगस्त्य" पासून हुडकले