"वैजनाथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२:
{{विस्तार}}
 
परळी वैजनाथ हे बारा [[ज्योतिर्लिंग]] मंदिरांपैकी एक आहे. हे [[ज्योतिर्लिंग]] भारतातील [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यात]] असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. [[महाशिवरात्र]]ीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.
 
'''परळी''' येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
ओळ १९:
 
==आणखी एक वैजनाथ==
भारताच्या [[बिहारझारखंड]] राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवगढदेवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/वैजनाथ" पासून हुडकले