"नामदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
''' संत नामदेव''' ([[इ.स. १२७०]] – [[जुलै ३]], [[इ.स. १३५०]]) हे [[महाराष्ट्र]]ातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते [[मराठी भाषा|मराठी भाषांमधील]] सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी [[पंजाबी भाषा|पंजाबी]] व [[व्रज]] भाषांमध्येही काव्ये रचली. [[शीख धर्म|शिखांच्या]] [[गुरू ग्रंथसाहिब]]ात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.
 
नामदेव हे ‘मराठीतील'पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे आज त्यांच्या जन्म स्थानी पंजाबी मंडळी त्यांवयाआज त्यांच्या जन्म स्थानीस्थानाचा, नर्सी या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत.
 
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
 
दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता.म्हणजे ते शिंपी होते. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपूरातपंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
 
संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
ओळ २०:
भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
 
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) [[पंढरपूर]] येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. [[कालनिर्णय दिनदर्शिका|कालनिर्णय]] या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो.सत संत नामदेव यांनी आपल्या कीर्तनाच्याहे मध्यकीर्तने मातूनकरत त्यांनीकरत भारतभर फिरले.
 
== नामदेवांसंबंधी आख्यायिका ==
ओळ ४९:
* पुण्यात महर्षीनगर येथील एका शाळेला संत नामदेव शाळा असे नाव दिले आहे.
* पुणे विद्यापीठात एक संत नामदेव अध्यासन आहे, आणि संत नामदेव सभागृह आहे.
* पंजाबमधील घुमान येथे बाबा नामदेव नावाचे एक पदवी महाविद्यालय आहे. (स्थापना १७-७-२०१६). घुमान गावी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] झाले होते.
* हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या गावी त्यांचे एक मोठे स्मारक आहे.
 
ओळ ५७:
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}} अग्निमाजी पडे बाळू माता धावे कनवाळू
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नामदेव" पासून हुडकले