"विज्ञानकथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ३:
विज्ञानसाहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झाला. इंग्रजीतली पहिली विज्ञानकथा फ्रँकेस्टाईन ही १८१८ साली मेरी शेली या लेखिकेने लिहिली. त्यानंतर बऱ्च काळानणतर इंग्रजी साहित्यात निर्माण झालेला विज्ञानसाहित्याचा प्रवाह मराठी भाषेतही यायला सुरुवात झाली.  
 
त्विज्ञानकथेचीविज्ञानकथेची सुरुवात सर्वप्रथम १९०० मध्ये कृष्णाजी आठले यांच्या ज्यूल्स व्हर्नच्या कादंबरीच्या 'चंद्रलोकची सफर' या नावाने केलेल्या  अनुवादाने झाली.   त्याचे  प्रकाशन 'केरळकोकिळ' या मराठी नियतकालिकात झाले.  ते काम सहा वर्े चालू होतं. त्यानंतर  १९११ साली श्रीधर रानडे यांनी लिहिलेल्या ' तारेचे हास्य' या त्यांनी स्वतः लिहिलेल्या कथेने विज्ञानकथा लेखनाची खरी पायाभरणी झाली. [[वा.म. जोशी]] यांनी लिहिलेल्या दोन कथा 'अप्रकाशित किरणांचा दिव्य प्रकाश ' आणि ' वामलोचना' १९१४ साली प्रकाशित झाल्या. 
 
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी विज्ञान कथा, कादंबऱ्या लिहिण्याचे काम थंडावले. पण, स्वातंत्र्योत्तर काळात १९५० नंतर अनुवादित विज्ञान कथांचे व कादंबऱ्यांचे लेखन पुन्हा सुरू झाले.  [[भा.रा. भागवत]] यांनी ज्यूल्स व्हर्न आणि एच.जी. वेल्स यांच्या अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज , ट्वेन्टी थाऊजंड लीग अंडर द सी , इनव्हिजिबल मॅन या कथा इथल्या मातीचा स्पर्श करून लिहिल्या. त्या कथा बालमित्रमध्ये छापून येत होत्या. त्यामुळे, त्या कथा जरी लहान थोर सगळ्यांना आवडल्या तरी विज्ञानकथेवर मात्र बालसाहित्य, साहसकथा असा शिक्का बसला. आणि त्यामुळे त्या कथांना जरी यश आले तरी विज्ञानकथांच्या प्रगतीत त्यामुळेच मोठा अडसर निर्माण झाला. त्याचा परिणाम [[यशवंत रांजणकर]], [[नारायण धारप]], [[द.पां. खांबेटे]], [[दि बा. मोकाशी]] यांच्या लेखनावर झाला. त्यातील बरेच लेखन हे अनुवादित वा रूपांतरित होते. पण, [[दि.बा. मोकाशी]] यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा मात्र स्वतंत्र होत्या.