"पृथ्वीचे वातावरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Dipak chaure (चर्चा)यांची आवृत्ती 1656750 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ २:
'''पृथ्वीचे वातावरण''' हा [[पृथ्वी]]च्या पृष्ठभागालगत तिच्या [[गुरुत्वाकर्षण|गुरुत्वाकर्षणामुळे]] लपेटून असलेला [[वायु|वायूंचा]] थर आहे. यात [[नायट्रोजन]] (७८.०८ %), [[प्राणवायू|ऑक्सिजन]] २१ % ०.९३ टक्के [[आरगॉन]] ०.०४ %[[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायऑक्साईड]], [[आर्द्रता]] इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास '''हवा''' असे म्हणतात.
 
पृथ्वी आणि इतर ग्रह व मोठे उपग्रह यांच्या भोवतालचे अनेक वायूंच्या मिश्रणाचे (हवेचे) आवरण म्हणजे वातावरण होय. पुरेशा सामर्थ्यवान गुरुत्वाकर्षणामुळे वातावरण या स्वस्थ गोलांच्या पृष्ठभागाला चिकटून राहते. स्वस्थ गोल स्वतःभोवती आणि इतर तारे किंवा ग्रह यांच्याभोवती आपल्या आवरणासह निरनिराळ्या अंतरांवरून फिरत असतात. सूर्यकुलातील बुधाखेरीज बहुतेक सर्व ग्रहांभोवती कमीअधिक प्रमाणात वातावरण आहे. सूर्यापासून दूर असलेल्या ग्रहांभोवती फिरणारे मोठे उपग्रहसुद्धा याला अपवाद नाहीत. हवे शिवाय माणूस जगू शकत नाही.
 
पृथ्वीचा जन्म ज्या वायूच्या व धुळीच्या ढगापासून झाल्याचे मानतात. त्याच्याशी सध्याच्या वातावरणाचा फारसा संबंध राहिलेला नाही, असे आढळले आहे. पृथ्वीवर ज्वालामुखीतून उत्सर्जित झालेली बाष्पनशील (बाष्परूपात वर आलेली ) द्रव्ये, भूकवचातील खडक, पाणी व पृथ्वीवरील जीवसृष्टी यांनी एकमेकांवर वेळोवेळी केलेल्या रासायनिक व इतर प्रकारच्या प्रक्रियांचा परिणाम होऊन सध्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. वातावरणात बदल घडवणाऱ्या अशा प्रक्रिया सौर प्रारणाच्या (तरंगरूपी ऊर्जेच्या) तीव्रतेवर आणि गुरुत्वांकर्षणाच्या प्रभावावर अवलंबून असतात.