"पोपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बदल साचा
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १७:
झाडाच्या ढोलीत अथवा भोकांत, घरांच्या भिंतीमधील भोकांत अथवा कधीकधी खडकांच्या कपारीत पोपट घरटी करतात. बहुतेक जाती घरट्याकरिता बाहेरच्या कोणत्याही पदार्थाचा उपयोग करीत नाहीत. मादी भोकाच्या आतल्या मोकळ्या जागेत अंडी घालते. काही जाती तर वाळवीच्या वारुळात अंडी घालतात. ऑस्ट्रेलियातील रानटी बजरीगार मात्र ढोलीत किंवा भोकात थोडेसे गवत घालून घरटे बनवितात. अर्जेंटिनातील एका जातीचे हिरवे पोपट प्रजोत्पादनाच्या काळात झाडांवर मोठी सामाईक घरटी बांधतात. वसाहतीच्या स्वरूपाच्या या घरट्यात प्रत्येक जोडप्याकरिता एक स्वतत्र खोली असते. ऑस्ट्रेलियातला एका जातीचा भूचर पोपट जमिनीवरील गवताच्या झुपक्यात घरटे तयार करतो.
 
मादी दरप्रत्येक खेपेस २–५ अंडी घालते; कधीकधी त्यांची संख्या ८ पर्यंतही असते. ती सापेक्षतया लहान असून पांढरी असतात. सर्वसाधारणपणे तीन आठवड्यानंतर अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात. ती केवळ मासांच्या गोळ्यांसारखी असून दुबळी असतात. आईबाप आपल्या अन्नपुटातले अर्धवट पचलेले शाकान्न बाहेर् काढून त्यांना भरवितात.
 
पोपट संघचारी (गटाने एकत्र राहणारे) असून सगळ्या पक्ष्यांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहेत. त्यांचा आवाज कर्कश, किंचाळल्यासारखा आणि कर्णकटू असतो; परंतु पाळून शिकविल्यानंतर यांच्या कित्येक जाती माणसासारखे शब्दोच्चार करु शकतात इतकेच नव्हे, तर दोनचार वाक्ये बोलू शकतात. यामुळे पुष्कळ लोक पोपट पाळतात. आफ्रिकेतील काही जातींचे पोपट (उदा., सिटॅकस एरिथॅकस) फार स्पष्ट शब्दोच्चार करतात. इतकेच नव्हे, तर निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतात. पोपट ३० ते ४० वर्षे जगतात. काही पोपट ८० वर्षे जगल्याचीही नोंद आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/पोपट" पासून हुडकले