"गरुड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५ बाइट्स वगळले ,  २ वर्षांपूर्वी
छो
(Reverted to revision 1627733 by V.narsikar (talk): Removing vandalism. (TW))
खूणपताका: उलटविले
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
 
== आकारमान ==
गरुड बऱ्याचशा शिकारी पक्ष्यांपेक्षा आकारमानानेआकाराने मोठे असतात; केवळ [[गिधाड|गिधाडेच]] गरुडांपेक्षा मोठी असतात.सर्पगरुड खूप लहान असतात तर फिलिपिन गरुड व हार्पी गरुड खूप मोठे असतात(त्यांचे आकामान साधारण १०० सेंटीमीटर असतो व वजन ९ किलोपेक्षा जास्त)
 
जंगलांमध्ये राहणाऱ्या गरुडांचे पंख छोटे असतात व शेपटी लांब असते, ज्यामुळे ते उडताना हवेतल्या हवेत अगदी सहज कलाटणी घेऊ शकतात. अधिक वेगाने, झाडांच्या फांद्यांमधून, लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना छोटे पंख उपयोगी पडतात. आकाशात उंच भरारणाऱ्या गरुडांचे पंख मात्र मोठे असतात व शेपटी छोटी असते. त्यामुळे ते वाढत्या वातप्रवाहावर सहजतेने तरंगू शकतात. परंतु याच कारणांमुळे त्यांना आकाशात झेपावणे व जमिनीवर उतरणे तुलनेने अवघड जाते<ref>[http://www.globio.org/glossopedia/article.aspx?art_id=48 गरुडांची माहिती]</ref>.
गरुडांच्या चोचीदेखील इतर शिकारी पक्ष्यांसारख्या मोठ्या व बळकट असतात. त्यांच्या बाकदार चोचींमुळे त्यांना मांस फाडणे सोपे जाते. गरुडांचे पाय व पंजे भक्ष्य पकडण्यासाठी बळकट असतात.
 
गरुडांची नजर खूपच तीक्ष्ण असते, कारण त्यांच्या डोक्याच्या मानाने डोळे खूपच मोठे असतात. त्यांची ही दृष्टी माणसांच्या चौपट तीक्ष्ण असते. माणसांना दृष्टिपटलावर प्रतिवर्ग मिलीमीटर दोन [[लक्ष]] प्रकाश-संवेद्य पेशी असतात, तर गरुडांना एक [[दशलक्ष]], म्हणजेच माणसांच्या पाचपट असतात. माणसांना जरी एकच गतिका (दृष्टिपटलामधील सर्वाधिक कार्यक्षम भाग) असली, तर गरुडांना त्या दोन असतात; त्यामुळे त्यांना एकाच वेळी समोर व बाजूंना पाहता येते. गरुडांच्या डोळ्याची बाहुली खूप मोठी असते; त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रकाशाचे कमीत कमी [[विवर्तन]] होते, यामुळे देखील त्यांची दृष्टी चांगली असते व त्यांना त्यांचे भक्ष्य खूप दुरूनही दिसते दिसतात<ref>[http://www.baldeagleinfo.com/eagle/eagle2.html गरुडांची दृष्टी]</ref>.
 
<gallery>
१६

संपादने