"ढग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४:
[[चित्र:Clouds in Victoria's sky in January.JPG|thumb|[[ऑस्ट्रेलिया]]तील व्हिक्टोरिया राज्यातून दिसणारे ढग व आकाश]]
{{विस्तार}}
 
ढग हे [[आकाश|आकाशात]] असणाऱ्या पाण्याच्या क्रिस्टल पासून बनतात. ढगांच्या उंचीनुसार ढगांची वर्गवारी केली जाते.
[[चित्र:'विमानतून_दिसलेले_विहंगम_दृश्य".jpg|दुवा=चित्र:'विमानतून_दिसलेले_विहंगम_दृश्य%22.jpg|इवलेसे|आकाशातील ढग]]
 
पदार्थांच्या असंख्य सूक्ष्म जलकणांचा  आणि / किंवा हिमकणांचा हवेत तरंगणारा दृश्य स्वरूपातील समुह म्हणजे ढग.<ref>{{स्रोत पुस्तक|title=ढगांचे विज्ञान|last=प्रा. वसंत पांडुरंग नेने|first=|publisher=पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन|year=२००६|isbn=|location=पुणे|pages=८}}</ref> जलकणा / हिमकणाबरोबरच ढगात सूक्ष्म धुलीकण किंवा धूम्रकणही असू शकतात.
जलचकरात पाण्याची [[वाफ]] होते, ती उंच जागी गेल्यावर त्याचे ढग होतात , व त्यास थंडावा मिळाला की [[पाऊस]] पडतो.
 
क्वचित प्रसंगी प्रदूषण , धुळीची  वादळे, ज्वालामुखी, अणूस्फोट अशा काही विशिष्ट कारणांमुळे संपूर्ण ढगच धुलीकण किंवा धूम्रकणांचा असू  शकतो.
 
जलचक्रात पाण्याची [[वाफ]] होते, ती उंच जागी गेल्यावर त्याचे ढग होतात , व त्यास थंडावा मिळाला की [[पाऊस]] पडतो.
 
पाऊस पडण्यासाठी ढगांची आवश्यकता असते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/navneet-news/what-are-the-clouds-1570355/|शीर्षक=ढगांची व्याप्ती|last=|first=|date=१६ ऑक्टोबर २०१७|work=लोकसत्ता|access-date=११ फेब्रुवारी २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
== '''ढगांची निर्मिती''' ==
ढगांची निर्मिती सर्वसाधारणपणे खालील प्रकारे होते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=ढगांचे विज्ञान|last=प्रा. वसंत पांडुरंग नेने|first=|publisher=पुणे विद्यार्थी गृह prakashan|year=२००६|isbn=|location=पुणे|pages=22}}</ref>
 
# भूपृष्ठावरील आर्द्रतायुक्त हवा अनेक कारणांमुळे वर वर जाऊ लागते. तप्त जमिनीचे  सानिध्य, पर्वत किंवा टेकडी सारखी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती अशा अनेक कारणामुळे अशा हवेला  उर्ध्वगामी दिशा मिळते.
# वर गेल्यावर ही हवा प्रसरण पावते आणि त्यामुळे आणखी हलकी होते. तिच्यावरील दाबही कमी होतो आणि ती अजूनच वर वर जाऊ लागते. अशी ती वर वर  जात असताना तिचे आंतरिक प्रसरण होते आणि ती थंड होऊ लागते..
# हवा थंड होऊ लागल्यामुळे तिची सापेक्ष आर्द्रता वाढत जाते.
# विशिष्ट उंचीवर गेल्यावर ती संपृक्त बिंदू गाठते.
# वातावरणात अनेक अदृश्य व सूक्ष्म असे धुलीकण धुम्रकण इतस्ततः संचार करत असतात. असे कण आर्द्रताग्राही असतात. हवा अजून वर जात राहिल्यास हवेचे म्हणजेच त्यातील जलबाष्पाचे तापमान द्रवांकाच्याही खाली जाऊन अशा सूक्ष्म कणांवर जलबाष्पाचे संद्रवण किंवा द्रवीकरण  होते आणि पाण्याचे थेंब तयार होतात. असे असंख्य जलबिंदू एकत्र आल्यावर दृश्य स्वरूपात अस्तित्वात येउन ढग तयार होतो.
 
ढगनिर्मितीची काही विशिष्ट कारणे
 
कधी कधी वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. अशा कमी दाबाच्या पट्ट्यात आर्द्र हवा सर्व बाजुनी प्रवेश करते आणि वर उचलली जाते. आंतरिक प्रसरणाने ती खूपच थंड होते आणि त्यामुळे विस्तृत क्षेत्रावर जाड व मोठ्या ढगांची निर्मिती होते.
 
टेकडी किंवा डोंगर उतारावर पायथ्याकडील वारे टेकडी किंवा डोंगरामुळे वर उचलले जातात.अशी  खूप आर्द्रतायुक्त हवा वर वर चढत जाते तेंव्हा तिचे आंतरिक प्रसरण होते व त्यामुळे ती थंड होते. त्या थंडाव्यामुळे हवेतील वाफेचे  सांद्रीकरण होते आणि धुके निर्माण होते आणि ढग तयार होतात.<ref>{{स्रोत पुस्तक|title=ढगांचे विज्ञान|last=प्रा. वसंत पांडुरंग नेने|first=|publisher=पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन|year=२००६|isbn=|location=पुणे|pages=२६}}</ref>
 
जमिनीवरील आर्द्रतायुक्त उष्ण हवा शीतप्रदेशाकडे किंवा समुद्राकडे वाहू लागते आणि ती थंड भृपृष्ठ किंवा समुद्राच्या सानिध्याने थंड होते. अशा थंडाव्यामुळे त्या हवेतील वाफेचे  सांद्रीकरण होते आणि धुके निर्माण होते. असे धुके वाऱ्याच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे वर उचलले जाऊन स्तरीय प्रकारच्या ढगांची निर्मिती होते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=ढगांचे विज्ञान|last=प्रा. वसंत पांडुरंग नेने|first=|publisher=पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन|year=2006|isbn=|location=पुणे|pages=२९}}</ref>
 
हिवाळ्यात जमिनीतून उष्णतेचे उत्सर्जन होऊन जमीन अधिक थंड होते. अशा  जमिनीवरची हवाही सानिध्याने थंड होऊन त्या हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते आणि धुके तयार होते. सूर्याच्या उष्णतेने किंवा उर्ध्वगामी प्रवाहामुळे हे धुके वर उचलले जाऊन स्तरीय प्रकारच्या ढगांची निर्मिती होते.<ref name=":0" />
 
== '''ढगांचे वर्गीकरण''' ==
आकाशात निरीक्षण केले असताना आपणास ढगांचे निरनिराळे आकार, रूप व विस्तार पाहायला मिळतो. ढगांचे वर्गीकरण ह्याच घटकांवर आधारित आहे.
 
ढगांचे सर्वप्रथम वर्गीकरण जे बी लामार्क ह्या फ्रेंच शास्त्रज्ञाने इ स १८०२ मध्ये केले. त्यानंतर इ स १८०३ मध्ये ल्युक हॉवर्ड ह्या शास्त्रज्ञाने वर्गीकरण प्रसिध्द करून खालील नावे जाहीर केली.<ref>{{स्रोत पुस्तक|title=ढगांचे विज्ञान|last=प्रा.वसंत पांडुरंग नेने|first=|publisher=पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन|year=2006|isbn=|location=|pages=9}}</ref>
 
# पिसांसारखे  किंवा कुरळ्या केसांसारखे दिसणारे तंतुमेघ
# स्तरीय मेघ
# राशिमेघ
# पाऊस देणारे वर्षामेघ
 
परंतु तंतुमेघ, स्तरीय मेघ, राशिमेघ व वर्षामेघ हे स्वतंत्ररीत्या किंवा एकमेकांच्या संयोगाने विविध स्वरुपात आढळून येतात. शेवटी जागतिक वातावरणवैज्ञानिक संघटनेने इ स १९५७ मध्ये ढगाच्या तळाची उंची,आकार, स्वरूप आणि इतर ढगांशी केलेला संयोग ह्याचा विचार करून ढगांच्या 10 मुख्य प्रजाती जाहीर केल्या आहेत<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=मराठी विश्वकोश|शीर्षक=मेघांचे वर्गीकरण|last=कोष्टक २|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=}}</ref> आणि त्याच आता जगभर ग्राह्य मानल्या जातात.
{| class="wikitable"
|पातळी
|जमिनीपासून मेघतळाची अंदाजे उंची (समशीतोष्ण प्रदेश)
|जमिनीपासून मेघतळाची अंदाजे उंची (धृविय प्रदेश)
|प्रजातीचे नाव
|-
|उच्च पातळी
|५ ते १४ कि मि
|३ ते 8 कि मि
|[[तंतुमेघ]]         Cirrus
|-
|
|५ ते १४ कि मि
|३ ते 8 कि मि
|[[तंतुराशिमेघ]]  Cirrocumulus
|-
|
|५ ते १४ कि मि
|३ ते 8 कि मि
|[[तंतुस्तरमेघ]] Cirrostratus
|-
|मध्य पातळी
|२ ते 7 कि मि
|२ ते ४ कि मि
|[[मध्यराशिमेघ]] Altocumulus
|-
|
|२ ते 7 कि मि
|२ ते ४ कि मि
|[[मध्यस्तरीमेघ]] Altostratus
|-
|निम्न पातळी
|भूपृष्ठ ते २ कि मि
|भूपृष्ठ ते २ कि मि
|[[वर्षास्तरीमेघ]] Nimbostratus
|-
|
|भूपृष्ठ ते २ कि मि
|भूपृष्ठ ते २ कि मि
|[[स्तरराशीमेघ]] stratocumulus
|-
|
|भूपृष्ठ ते २ कि मि
|भूपृष्ठ ते २ कि मि
|[[स्तरमेघ]] Stratus
|-
|
|भूपृष्ठ ते २ कि मि
|भूपृष्ठ ते २ कि मि
|[[राशीमेघ]] Cumulus
|-
|
|भूपृष्ठ ते २ कि मि
|भूपृष्ठ ते २ कि मि
|[[गर्जन्मेघ]] Cumulonimbus
|}
याशिवाय इतरही काही ढग काही विशीष्ट स्थळी / विशीष्ट परिस्थितीत तयार होतात. मात्र ते वरील वर्गीकरणात मोडत नाहीत. उदा, ज्वालामुखी निर्मित, अणुस्फोटजन्य, अडथळाजन्य बहिर्गोल भिंगाकार ढग ,इत्यादी.
 
ढगांचे अस्तित्व पृथ्वी व्यतिरिक्त इतरत्रही आढळून येते.
 
शुक्रावर ढगांचे आवरण आढळले असून तेथे सल्फर डायऑक्साइडचे घनदाट ढग आढळून येतात.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Bougher, Stephen Wesley; Phillips, Roger (1997). Venus II: Geology, Geophysics, Atmosphere, and Solar Wind Environment. University of Arizona Press. pp. 127–129. ISBN 978-0-8165-1830-2|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref>हे  ढग स्तरीय प्रकारचे मेघ असून ज्वालामुखीय हालचालींमुळे तयार झाले आहेत. हे ढग  45 ते 65 किमी उंचीवर तीन मुख्य स्तरामध्ये आढळतात आणि त्यामुळे शुक्राच्या पृष्ठभागाचे  निरीक्षण करणे जवळ जवळ अशक्य बनते. त्याखाली शुक्रावर कोणतेही राशीमेघ प्रकारचे ढग आढलेलेले नाहीत परंतु वरील पातळीवर कधीकधी स्तरराशीमेघ प्रकारचे तुटक स्वरूपातील ढग आढळून येतात.
 
मंगळावर बहिर्गोल भिंगाकार ( lenticular) , तंतुमेघ , तंतुराशीमेघ  आणि पाण्यापासूनच्या बर्फाने बनलेले स्तरराशीमेघ असे काही प्रकारचे ढग  बहुतांशी ध्रुवभागाजवळ आढळले आहेत.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=|शीर्षक=SPACE.com staff (2006-08-28). "Mars Clouds Higher Than Any On Earth". SPACE.com. Retrieved 2008-10-19.|last=|first=|date=|work=|access-date=|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref><ref>{{जर्नल स्रोत|last="Clouds Move Across Mars Horizon". Phoenix Photographs. National Aeronautics and Space Administration. 19 September 2008. Retrieved 15 April 2011.|first=|date=|title=|url=|journal=|volume=|pages=|via=}}</ref> मंगळावर पाण्याचे बर्फ आणि त्यापासूनचे धुकेदेखील आढळले  आहे.<ref>{{जर्नल स्रोत|last="NASA SP-441: Viking Orbiter Views of Mars". National Aeronautics and Space Administration. Retrieved 26 January 2013.|first=|date=|title=|url=|journal=|volume=|pages=|via=}}</ref>
 
गुरु  आणि शनि या दोन्ही ग्रहांवर  उच्च स्तरावर अमोनियापासून बनलेले तंतुमेघ, मध्यस्तरावर अमोनियम हायड्रोसल्फाईडपासून बनलेलले  धुके सदृश्य स्तरीय मेघ, आणि निम्न स्तरावर जलकणांचे राशीमेघ आढळून येतात. तसेच गुरूच्या अंतर्भागात लाल ठिपक्याजवळ गर्जन्मेघ अस्तित्त्वात असल्याचे ज्ञात आहे. अशाच प्रकारचे ढगांचे आच्छादन  युरेनस आणि नेपच्यूनवर देखील आढळते परंतु हे आच्छादन मिथेनचे बनलेले आहे. शनिचा उपग्रह टायटनवर मिथेनचेच बनलेले तंतुमेघ आढळतात. कॅसिनी-ह्यूजेन्स शनि मोहिमेत शनीवरील ध्रुवीय स्तरीय ढगांचा आणि टायटनवरील मिथेन चक्राचा पुरावा सापडला आहे.
 
सूर्यमालेबाहेरील  काही ग्रहांवरच्या  वायुमंडलात ढगांचे अस्तित्व असल्याचे मानले  जाते. ऑक्टोबर 2013 मध्ये, केप्लर -7 बी ह्या सूर्यमालेबाहेरील ग्रहाच्या  वातावरणात उच्च स्तरावर घनदाट ढगांचे अस्तित्व घोषित करण्यात आले आहे. तसेच डिसेंबर 2013 मध्येही  जीजे 436 बी आणि जीजे 1214 बी ह्या ग्रहांच्या वातावरणात ढगांचे अस्तित्व जाहीर झाले आहे.
पाऊस पडण्यासाठी ढगांची आवश्यकता असते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/navneet-news/what-are-the-clouds-1570355/|शीर्षक=ढगांची व्याप्ती|last=|first=|date=१६ ऑक्टोबर २०१७|work=लोकसत्ता|access-date=११ फेब्रुवारी २०१९|archive-url=|archive-date=|dead-url=}}</ref>
 
==रोचक तत्थ्य==
Line २१ ⟶ १२२:
[[वर्ग:निसर्ग]]
[[वर्ग:भूगोल]]
<references />
"https://mr.wikipedia.org/wiki/ढग" पासून हुडकले