"आवर्त सारणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
उत्पात
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''आवर्त सारणी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Periodic Table'', ''पिरियॉडिक टेबल'') ही [[मूलद्रव्य|रासायनिक मूलद्रव्यांना]] तक्त्याच्या रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे. मूलद्रव्यांना कोष्टकरूपात दाखवण्याच्या काही पद्धती जुन्या काळी प्रचलित होत्या (उदा. [[डोबेरायनरची त्रिके]], [[न्यूलँडची अष्टके]]). या पद्धतींद्वारे केली जाणारी मांडणी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करता येत नसे.
 
== मेंडेलीवचीमेंडेलीव्हची आवर्त सारणी ==
[[चित्र:Mendelejevs periodiska system 1871.png|thumb|300px|मेंडेलीवची आवर्त सारणी (इ.स. १८७२ ची आवृत्ती)]]
[[इ.स. १८६९]] साली [[रशिया|रशियन शास्त्रज्ञ]] [[दिमित्री मेंडेलीव]] याने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली. मेंडेलीवने मूलद्रव्यांना त्यांच्या अणु-वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यानंतर मेंडेलीवने मूलद्रव्यांची आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरूवात केली. जर त्याला आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी साधर्म्य असलेले दुसरे मूलद्रव्य सापडले, तर ते त्याने नवीन ओळीत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडले. मेंडेलीवला अश्या सारणीतून मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमधील आवर्तानुसारी कल ठळकपणे दाखवायचे होते. काळागणिक जसजशी नव्या मूलद्रव्यांची भर पडत गेली, तसतशी मेंडेलीवच्या मूळ सारणीची रचना वाढत वाढत बदलली गेली.