"हैद्राबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? संदर्भा विना भला मोठा मजकुर !
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ ९८:
 
शहरांतर्गत वाहतुकीसाठी उपनगरीय रेल्वेसेवा, बससेवा व त्याशिवाय मीटरप्रमाणे पैसे घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी ऑटोरिक्षाही येथे आहेत.
 
== क्रीडा ==
क्रिकेट आणि पादकंदुक (फूटबॉल) हे शहरातील लोकप्रिय खेळ आहेत. लाल बहादूर शास्त्री मैदान व उप्पलचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान या दोन मैदानांवर क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने होतात. उप्पलचे मैदान हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे घरचे मैदान आहे. स्वर्णधारा प्रदेश क्रीडा संकुल हे मैदानी हॉकीचे केंद्र आहे तर गचीबावलीचे जी. एम. सी. बालयोगी मैदान अ‍ॅथलेटिक्स आणि पादकंदुकाचे केंद्र आहे.
 
रणजी करंडक या देशातील प्रथमश्रेणी क्रिकेटस्पर्धेत हैदराबाद क्रिकेट संघ भाग घेतो. इंडिअन प्रिमिअर लीगमधील २०१२पर्यत डेक्कन चार्जर्स या संघाचे मुख्यालय हैदराबाद शहरात होते , यानंतर हा संघ आयपीएलमधून बाद कराण्यात आला . डेक्कन चार्जर्स बाद झाल्यानंतर २०१३मध्ये हैदराबादचाच नवीन संघ आयपीएल मध्ये समाविष्ट करण्यात आला तो म्हणजे सनरायझर्स हैदराबाद. हा संघ आयपीएलमध्ये हैदराबाद शहराचे प्रतीनिधित्व करतो . सिकंदराबाद क्लब, निजाम क्लब, हैदराबाद रेस क्लब, आंध्र प्रदेश मोटर स्पोर्ट्‌स क्लब, हैदराबाद गोल्फ क्लब हे शहरातील प्रसिद्ध क्लब आहेत.
 
=== प्रसिद्ध खेळाडू ===
* [[क्रिकेट]] : [[गुलाम अहमद]], [[एम.एल. जयसिंहा]], [[मोहम्मद अझहरुद्दीन]], [[व्ही.व्ही.एस. लक्ष्मण]], [[वेंकटपती राजू]], [[शिवलाल यादव]], [[अर्शद अय्युब|अर्शद अयूब]], [[नोएल डेव्हिड]].
* [[टेनिस]] : [[सानिया मिर्झा]].
* [[फुटबॉल]] : सय्यद अब्दुल रहीम, सय्यद नयीमुद्दीन, शब्बीर अली.
* [[बॅडमिंटन]] : एस. एम. अरिफ, पुल्लेला गोपीचंद, [[सायना नेहवाल]], ज्वाला गुत्ता, चेतन आनंद.
* [[हॉकी]] : सय्यद मोहम्मद हादी, मुकेश कुमार
 
== संस्कृती ==
 
'''साहित्य'''
 
निझामाच्या काळात राजाश्रय मिळाल्याने हैदराबादमध्ये [[उर्दू]] साहित्य भरभराटीला आले. या काळात [[उर्दू भाषा|उर्दू]] साहित्यिकांचे मुशायरे (संमेलने) होत. [[उर्दू भाषा|उर्दू]] त्याचप्रमाणे [[तेलुगू]] साहित्य प्रसिद्धीचे महत्त्वाचे केंद्र अशी हैदराबादची ओळख झाली. इ. स. २०१० पासून शहरात दरवर्षी हैदराबाद लिटररी फेस्टिव्हल भरवला जातो. त्यात देशपरदेशातले साहित्यिक सहभागी होतात.
 
'''कला आणि चित्रपट'''
 
१६ व्या शतकापासून हैदराबादेत कथ्थक नृत्याला आश्रय मिळाला आहे. तेलुगू चित्रपट उद्योगाचे हैदराबाद हे केंद्र आहे. त्यामुळे तेलुगू चित्रपटनिर्मिती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडच्या काळात दूरचित्रवाणी उद्योगही हैदराबादेत विस्तारला आहे. हैदराबादजवळच्या रामोजी फिल्म सिटीने मनोरंजन उद्योगात देशात अनेक सन्मान मिळवले आहेत
 
== हेसुद्धा पहा ==
* ऐतिहासिक [[हैदराबाद मुक्तिसंग्राम]]चा आढावा.
* [[सालारजंग संग्रहालय]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
{{भारतीय राज्ये आणि प्रदेशांची राजधानी}}
 
[[वर्ग:हैदराबाद जिल्हा]]
[[वर्ग:मुखपृष्ठ सदर लेख]]
[[वर्ग:हैदराबाद|*]]