"हैद्राबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ६४:
 
तेलंगण भागाचे वेगळे राज्य व्हावे, यासाठी आंध्रप्रदेशच्या स्थापनेपासून चळवळ सुरू राहिली. अखेर जुलै इ. स. २०१३ मध्ये केंद्रातील सत्ताधारी आघाडीच्या मान्यतेनंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीने [[तेलंगणा|तेलंगण]] या नव्या राज्याच्या निर्मितीचा ठराव मंजूर केला आणि हैदराबाद ही आंध्रप्रदेश आणि तेलंगण या दोन्ही राज्यांची १० वर्षांसाठी राजधानी राहील हेही ठरवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindu.com/news/national/andhra-pradesh/telangana-will-be-indias-29th-state/article4970069.ece|title=Telangana will be India’s 29th State|first=Smita|last=Gupta|date=30 जुलै, 2013|via=www.thehindu.com}}</ref>
 
== भूगोल ==
[[चित्र:Hussainsagar hyd.jpg|left|thumb|हुसेनसागर तलाव]]
 
हैदराबाद दक्षिण भारतात दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडील भागात वसले आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ६५० चौरस किलोमीटर आहे. करड्या आणि गुलाबी ग्रॅनाईटपासून बनलेली खडकाळ चढउताराची जमीन हे हैदराबादच्या भूपृष्ठाचे वैशिष्ट्य. हैदराबाद समुद्रसपाटीपासून सरासरी ५४२ मीटर उंचीवर आहे. बंजारा हिल्स हा शहरातील सर्वात उंच भाग आहे. शहरात आणि सभोवताली इ. स. १९९६ पर्यंत १४० हून अधिक लहानमोठी तळी होती. इ. स. १५६२ मध्ये बांधलेला हुसेनसागर तलाव शहराच्या मध्यभागी आहे. [[चारमिनार]] आणि [[मक्का मस्जिद]]असलेले जुने शहर मुसी नदीच्या काठावर वसलेले आहे. हा शहराचा जुना मध्यवर्ती भाग आहे. शहराचा नवा विस्तार चारही दिशांनी झाला आहे.
 
हैदराबाद दमट आणि कोरड्या कटिबंधीय वातावरणाचा संमिश्र अनुभव देणारे शहर आहे. शहराचे वार्षिक सरासरी तापमान २६ अंश सेल्शियस आहे. एप्रिल आणि जून दरम्यान शहराचे कमाल तापमान अनेकदा ४० अंश सेल्शियसवर जाते. जून ते सप्टेंबर या मॉन्सूनच्या काळात शहरात पाऊस पडतो.
 
== प्रशासन ==
शहराची देखभाल बृहद् हैदराबाद महानगरपालिका करते. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेची स्थापना एप्रिल २००७ मध्ये हैदराबाद महानगरपालिका आणि जवळच्या दोन जिल्ह्यांतील १२ नगरपालिकांचे विलिनीकरण करून झाली. बृहद् हैदराबाद महानगरपालिकेचे क्षेत्र ६५० चौरस किलोमीटर आहे. हैदराबाद, [[रंगरेड्डी जिल्हा|रंगारेड्डी]] आणि [[मेदक]] या तीन जिल्ह्यांत तिचा विस्तार आहे. महानगरपालिकेचे १५० आहेत. हे वॉर्ड १८ मंडले आणि पाच विभाग (झोन्स) यात वाटले गेले आहेत. महापालिकेचे महापौर लोकांनी निवडलेले प्रमुख असतात,तर आयुक्त हे [[भारतीय प्रशासकीय सेवा]] दर्जाचे अधिकारी प्रशासकीय प्रमुख असतात.
 
याशिवाय आंध्र प्रदेश विधानसभा, आंध्र प्रदेश सचिवालय आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालय हैदराबादलाच आहेत. हैदराबाद महानगरपालिका क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे २४ विधानसभा मतदारसंघ आहेत. शहरात [[लोकसभा|लोकसभेचे]] पाच मतदारसंघ आहेत
 
== समाजरचना ==
[[चित्र:India food.jpg|left|150px|thumb|[[हैदराबादी बिर्याणी]] (डावीकडे) आणि इतर खाद्यपदार्थ]]
 
हैदराबादमध्ये हिंदूंची आणि मुस्लिमांची लोकसंख्या आहे. शहरात माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या वाढीनंतर भारताच्या सर्व भागांतून मोठ्या प्रमाणात लोक हैदराबादला येऊन वसत आहेत, त्यामुळे शहराचे स्वरूप बहुभाषिक झाले. तेलुगू भाषेमध्ये "डेक्कनी उर्दू" नंतर सर्वात जास्त भाषिक आहेत.
 
याशिवाय तामिळ, कन्नड, गुजराती, राजस्थानी यासह अनेक भारतीय भाषा बोलणारे येथे राहतात. तेलुगू आणि उर्दूचा येथील हिंदीवर परिणाम होऊन हैदराबादी हिंदी ही नवी शैली पुढे आली. व्यापारउदीम, सरकारी कामकाजात इंग्रजीचाही वापर केला जातो. आपल्या खास पद्धतीच्या पक्वान्नांसाठीही, विशेषतः मांसाहारी पक्वान्नांसाठी, हैदराबाद प्रसिद्ध आहे. हैदराबादी बिर्याणी हा पदार्थ जगभरात नावाजलेला आहे.
 
== उद्योगधंदे ==
हैदराबाद ही पारंपरिकरीत्या, [[लसूण]] आणि मसाल्याचे पदार्थ, [[नारळ]], [[सुपारी]], केळी आदी फळांची मोठी बाजारपेठ होती. आजचे हैदराबाद मात्र माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, शिक्षण, मनोरंजन या क्षेत्रात देशातील केंद्र बनले आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील अनेक जागतिक कंपन्यांनी आपली कार्यालये येथे थाटली आहेत. औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे प्रकल्प हैदराबाद शहर आणि परिसरात आहेत. तेलुगू चित्रपट आणि दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्मिती उद्योगाचे हैदराबाद हे केंद्र आहे.
 
== वाहतूक ==
=== बसस्थानके ===
हैदराबादेतील महात्मा गांधी बसस्थानक हे आशियातील पहिल्या पाच सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे. देशाच्या अनेक भागातून बसगाड्या येथे येतात. हैदराबाद शहर आणि परिसरात आंध्रप्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (एएसआरटीसी) या सरकारी महामंडळाच्या बसगाड्या धावतात.
 
=== रेल्वेस्थानके ===
[[हैदराबाद डेक्कन रेल्वे स्थानक|हैदराबाद डेक्कन]] (नामपल्ली), [[काचीगुडा रेल्वे स्थानक|काचीगुडा]] आणि [[सिकंदराबाद रेल्वे स्थानक|सिकंदराबाद]] ही तीन प्रमुख [[रेल्वे स्थानक]]े शहरात आहेत. शहरात उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध असल्याने या सेवेची इतर लहान स्थानकेही आहेत. हैदराबादच्या जुळ्या सिकंदराबाद शहरातच [[दक्षिण मध्य रेल्वे|दक्षिण मध्य रेल्वेचे]] मुख्यालय आहे. रेल निलयम या संकुलात ते वसलेले आहे. हैदराबादहून देशाच्या सर्व भागांत जाण्यायेण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध आहे.
 
=== विमानतळ ===
हैदराबादेत मार्च २००८ मध्ये शमशाबाद येथे [[राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा नवा अत्याधुनिक विमानतळ चालू झाला. यापूर्वीचा [[बेगमपेट विमानतळ]] वाढत्या हवाई वाहतूक गरजांसाठी अपुरा पडू लागल्यानंतर हा नवा विमानतळ बांधून सुरू करण्यात आला. देशाच्या सर्व भागांत तसेच पश्चिम आशिया, आग्नेय आशियासह जगाच्या अनेक भागांत हैदराबादहून थेट विमानसेवा आहेत.
 
शहरांतर्गत वाहतुकीसाठी उपनगरीय रेल्वेसेवा, बससेवा व त्याशिवाय मीटरप्रमाणे पैसे घेऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीनचाकी ऑटोरिक्षाही येथे आहेत.