"यदु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १:
'''यदु''' हा [[हिंदू]] पौराणिक साहित्यात वर्णिलेला वंशकर्ता राजा होता. तो राजा [[ययाति]] व त्याची पत्नी [[देवयानी (पौराणिक व्यक्तिरेखा)|देवयानी]] यांचा थोरला पुत्र होता. [[विष्णु पुराण|विष्णु]], [[भागवत पुराण|भागवत]] व [[गरुड पुराण|गरुड पुराणांनुसार]]ांनुसार यदूस चार पुत्र झाले, तर पौराणिक साहित्यात अन्यत्र त्यास पाच पुत्र असल्याचे उल्लेख आहेत. क्रोष्टु, सहस्रजित्, नल, अंतिक व लघु अशी त्याच्या पुत्रांची नावे आढळतात. याच्यापासून सुरू झालेल्या वंशाला [[यादव कुळ]] किंवा ''[[यदुवंश]]'' असे उल्लेखले जाते. ]]कृष्ण]] हा यदुवंशात जन्मला.
 
== यदूचे पूर्वज ==
ब्रह्मा - दक्ष - विवस्वत - मनु - चंद्र - पुरूरवा - आयु -. नहुष - [[ययाति]] - (यदु). हे यदूचे क्रमशः पूर्वज होत. (यादीत फक्त ज्येष्ठ पुत्राचे नाव आहे)
 
== श्रीकृष्णाचे पूर्वज ==
यदु - क्रोष्टु - वृज्जीवंत - स्वाही - स्वती - रसदु - चित्ररथ - शशबिंदु - पृथुश्रवस् - अंतर - सुयज्ञ - उशनस् - शिनेयु - मरुत - कंबलबर्हिस् (?) - रुक्मकवच - परावृष्ट - जयमध - विदर्भ - क्रय - कुंती - धाष्टी - निवृत्ति - दशाई - व्योम - जीमूत - विकृति - भीमरथ - रथवर - नवरथ - दशरथ - एकादशरथ - शकुनी - कुरंभी - देवरत - देवक्षेत्र - देवन् - मधु - पुरूवश - पुरूहोत्र - अंशु - सत्वत् - भीम - भजमान - चित्ररथ - विदुरथ - शूर - शर्मन् - प्रतिक्षात्र - स्वयंभोज - हृदिक - देवभिथुश (?) - शूर (२) - वसुदेव - ([[कृष्ण]])
 
== श्रीकृष्णाचे वंशज ==
([[कृष्ण]]) - प्रद्युम्न - अनिरुद्ध - वज्रनाभ - प्रतिबाहु - सुबाहु - शांतसेन - सत्यसेन - श्रुतसेन - गोविंदभद्र - सूर्यभद्र - शांतिवाहन - सद्विजय - विश्वराह - क्षेमराह/खेंगार - हरिराज - सोम.
 
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:यादव कुळ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/यदु" पासून हुडकले