"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो सांगकाम्याद्वारेसफाई
 
ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]]ातील सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. ही संस्था अण्णासाहेब खापर्डे यांनी [[जानेवारी १४]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे स्थापन केली. त्यानंतर मार्च १९५०मध्ये तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हलवण्यात आले. आजही ते [[नागपूर]] येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी [[विदर्भ साहित्य संमेलन]] भरवते.
 
विदर्भ साहित्य संघाचे ’[[युगवाणी]]’ या नावाचे एक साहित्य विषयाला वाहिलेले त्रैमासिक आहे. विदर्भ साहित्य संघाच्या गोंदिया शाखेमध्ये 'भवभूती रंगमंदिर' नावाचे नाट्यगृह आहे. विदर्भ साहित्य संघाच्या खामगाव शाखेत १९५८मध्ये ’[[कोल्हटकर]] स्मारक मंदिर’ उभारण्यात आले आहे.
 
== कार्य ==
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशित करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आहे. संस्थेतर्फे मराठी साहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवले जातात. १९४६सालापासून विदर्भ साहित्य संघ हा 'मराठी साहित्य परीक्षा' घेत आला आहे.
 
== बालसाहित्यावर चर्चासत्र ==
* २२ डिसेंबर २०१८ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुढाकाराने विदर्भ साहित्य संघाचे [[बुलढाणा]] येथे बालसाहित्यावर एक दिवसाचे राज्यस्तरीय चर्चासत्र झाले.
 
== मराठी साहित्य परीक्षा ==
* इयत्ता ५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी ’प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा’ या परीक्षा
* इयत्ता १०वी समकक्ष साहित्य विनीत ही परीक्षा
ओळ २१:
* साहित्य वाचस्पती ही अत्युच्च परीक्षा (डी.लिट. समकक्ष).
 
== विदर्भ साहित्य संघाची प्रकाशने ==
* आणखी [[गडकरी]]
* कविता विदर्भाची
ओळ ४६:
* वक्ता दशसहस्रेषु
* वसंत वैभव : (कै. [[वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे]])
* कै. [[वा.ना. देशपांडे]] यांचे स्फुट-लेखन, ३ खंड : तुलाधर, चित्रगुप्त, त्रिविक्रम
* विदर्भ साहित्य संघ - अमृत महोत्सवी स्मरणिका (१९९९)
* विदर्भ साहित्य संमेलने : अध्यक्षीय भाषणे : खंड १
ओळ ५९:
 
== विस्तार ==
सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील खामगाव, चंद्रपूर(स्थापना १९५४; संस्थापक तु.ना. काटकर), गोंदिया(स्थापना १९५६), लाखनी, वर्धा, वाशीम आदी सर्व महत्त्वाच्या शहरांत मिळून संघाच्या (२०१३ साली) ५९ शाखा आहेत.
 
लाखनी(भंडारा जिल्हा) येथील विदर्भ साहित्य संघाची शाखा कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]]ांनी स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.
 
== विदर्भ साहित्य संघाच्या शाखा ==
* [[अकोला]] : [[अकोला]], [[आकोट]], चौहोट्टा बाजार, [[बार्शी-टाकळी]]
* [[अमरावती]] : [[अचलपूर]]-[[परतवाडा]], [[अंजनगाव]]सुर्जी, [[अमरावती]], [[दर्यापूर]], [[धामणगाव]], [[मार्शी]], [[वरूड]]
* [[गडचिरोली]] : [[अहेरी]], आरमोरी, कुरखेडा, [[धानोरा]]
* [[गोंदिया]] : [[अर्जुनी मोरगाव]], [[गोंदिया]], तिरोडा
* [[चंद्रपूर]] : [[चंद्रपूर]](या शाखेलाच गोंडवण शाखा म्हणतात.), नागभीड, बल्लारशा, भद्रावती, राजुरा, [[वरोरा]]
* [[नागपूर]] : [[उमरेड]], [[कामठी]], नरखेड, [[रामटेक]]
* [[बुलढाणा]] : [[खामगाव]], चिखली, नांदुरा, डोणगांव, [[बुलढाणा]], [[मलकापूर]], [[मेहकर]], [[मोताळा]], लोणार, [[शेगाव]], हिवरा आश्रम
* [[भंडारा]] : जवाहरनगर, [[तुमसर]], पवनी, [[भंडारा]], [[लाखनी]], [[साकोली]]
* [[यवतमाळ]] : [[आर्णी]], उमरखेड, दिग्रस, पाटणबोरी, [[पांढरकवडा]], [[पुसद]], [[यवतमाळ]], वणी
* [[वर्धा]] : [[पुलगाव]], [[वर्धा]], सिंदी रेल्वे
* [[वाशीम]] : कारंजा (लाड), [[वाशीम]]
 
== पुरस्कार ==
दरवर्षी १४ जानेवारीला विदर्भ साहित्य संघाचा वर्धापनादिन साजरा होतो. या दिवशी काही खास पुरस्कार जाहीर करण्यात येतात. २०१३सालासाठी जाहीर करण्यात आलेले पुरस्कार (प्रत्येक पुरस्कार ५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह) :
 
* [[श्री. ना. पेंडसे]] यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कादंबरी वाङ्‍मयातील लक्षवेधी योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रा. [[सुरेश द्वादशीवार]] यांना विशेष पुरस्कार
* [[पु. ल. देशपांडे]] स्मृति कादंबरी पुरस्कार अशोक पवार यांच्या 'पडझड' या कादंबरीला
* [[शरच्चंद्र मुक्तिबोध]] स्मृति कवितालेखन पुरस्कार प्रभू राजगडकर यांच्या 'निवडुंगाला आलेली फुलं' या काव्यसंग्रहाला
* समीक्षा वाङ्‍मयासाठी देण्यात येणारा कुसुमानिल स्मृति समीक्षा पुरस्कार डॉ. हेमंत खडके यांना त्यांच्या 'अर्वाचीन मराठी काव्यविचार' या ग्रंथासाठी
* [[बा.रा. मोडक]] स्मृति बालसाहित्य लेखन पुरस्कार डॉ. छाया कावळे यांना त्यांच्या ’बालकथा साहित्य : स्वरूप व चिंतन' या ग्रंथासाठी
ओळ ९०:
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील संस्था]]
[[वर्ग:विदर्भ]]