"रणथंभोर राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीत भर घातली
छो सांगकाम्याद्वारेसफाई
ओळ १६:
|दुवा = {{URL|http://www.ranthamborenationalpark.com/}}
}}
रणथंभोर राष्ट्रीय उद्यान हा भारतातील एक प्रमुख [[व्याघ्रप्रकल्प]] आहे. अत्यंत कमी वनक्षेत्रातील वाघांची जास्त संख्या हे या प्रकल्पाचे वैशिट्य होते. परंतु याच कारणाने हे वनक्षेत्र चोरट्या शिकारींसाठी पण नंदनवन बनले. रणथंभोर व्याघ्रप्रकल्प हा राजस्थानमधील [[सवाई माधोपूर]] या जिल्ह्यात आहे व [[जयपूर]]पासून साधारणपणे १३० किमी अंतरावर आहे.
 
या उद्यानात उत्तरेकडे बनास नदी वाहते तर दक्षिणेकडे [[चंबळ नदी]] वाहते. उद्यानात अनेक तळी आहेत. तेथे वन्यप्राणी हमखास पहायला मिळतात. उद्यानाच्या मध्यभागीच प्रसिद्ध [[रणथंबोरचा किल्ला]] आहे त्यावरून या उद्यानाचे नाव पडले आहे. गेली कित्येक शतके ह्या किल्यात वस्ती नसल्याने हा भकास झाला आहे. या किल्यातच काही वाघांनी आपले घर थाटले होते. या विषयावर [[वाल्मीक थापर]] यांनी अतिशय सुरेख चित्रण करून एक माहितीपट बनवला आहे. या अभयारण्यात इतर प्रमुख प्राण्यांमध्ये बिबटे, [[रानडुक्कर]], [[सांबर]], [[चितळ]], [[गवा]] व [[नीलगाय]] यांचाही समावेश होतो.
ओळ २२:
== रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाची माहिती ==
* राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ - एकूण ३९२ चौरस किमी. त्यातील गाभाक्षेत्र २७५ चौ. किमी.
* [[व्याघ्रप्रकल्प|व्याघ्रप्रकल्पाचे]]ाचे क्षेत्र - १३३४ चौ.किमी.
* समुद्रसपाटीपासून उंची - २१५ ते ५०० मीटर
* जंगलाचा प्रकार - विषववृत्तीय शुष्क प्रकारचे जंगल