"बोधिवृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८८ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
छो
सांगकाम्याद्वारेसफाई
छो (सांगकाम्या_द्वारे_सफाई)
छो (सांगकाम्याद्वारेसफाई)
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''बोधिवृक्ष''' किंवा '''महाबोधी वृक्ष''' म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. [[बोधगया]] येथील [[महाबोधी विहार]]ाच्या पश्चिमेला जो [[पिंपळ]] आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला [[इ.स.पू. ५२८]] मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/[[बुद्धत्व]]) प्राप्ती होऊन ते [[बुद्ध]] बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. [[सम्राट अशोक]] बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या [[संघमित्रा]] हिने या बोधिवृक्षाची एक फांदी [[श्रीलंका|श्रीलंकेत]] नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू दुसऱ्या शतकात [[पुष्पमित्र शुंग]]ने आणि [[इ.स. ६००]] मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला होता.
 
चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.<ref>{{स्रोत पुस्तक|first1=Melton|last1= J. Gordon|first2= Baumann|last2=Martin|year=2010|url=https://books.google.com/books?id=v2yiyLLOj88C|शीर्षक= ''Religions of the World: A Comprehensive Encyclopedia of Beliefs and Practices, Second edition|publisher=[[ABC-CLIO]], Santa Barbara|isbn=1598842048|pages=358}}</ref>
[[Fileचित्र:Buddha Meditating Under the Bodhi Tree, 800 C.E.jpg|thumbइवलेसे| बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बुद्ध शिल्प]]
 
[[बौद्ध]] धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज ([[हत्ती]]) हे बोधिवृक्षाची [[पूजा]] करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात. गया माहात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांचा पुष्कळ महिमा गायलेला आहे.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड सहावा</ref> [[इ.स. १८६२]] मध्ये [[ब्रिटिश]] पुरातत्त्व अधिकारी [[अलेक्झांडर कनिंगहॅम]] यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली.
 
== उत्सव ==
=== बोधी दिवस ===
गौतम बुद्धांना [[८ डिसेंबर]] रोजी बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली याचे स्मरण म्हणून [[बोधी दिवस]] हा सण म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी बौद्ध अनुयायी एकमेकांना भेटून “बुदू सरणयी” (बुद्धांमुळे तुमचे जीवन प्रकाशमान होवो) अशा सदिच्छा देतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://westproxy.lib.hawaii.edu:2051/hottopics/lnacademic/?verb=sr&csi=235865&sr=BYLINE(David)%2Bw%2F3%2BSelf)%2BAND%2BHLEAD(Dates+for+assembly)%2BAND%2BDATE%2BIS%2B2005-12-2|शीर्षक= University of Hawaii}}</ref>
== उद्गम आणि वारसा ==
<blockquote> प्रख्यात बोधिवृक्ष आजही अस्तित्वात आहे. परंतु त्याचा पुष्कळसा ऱ्हास झालेला आहे; एक मोठे खोड, पश्चिमेकडील तीन फांद्या, अजूनही हिरव्या आहेत, परंतु अन्य फांद्या सालीसह वाळल्या आहेत. त्या हिरव्या फांद्या कदाचित् मूळ बोधिवृक्षाच्या असाव्यात, कारण तेथे असंख्य एकत्रित खोडे उघडपणे दिसतात. बोधिवृक्षाचे नियमितपणे निश्चित पुनरुजीवन झाले आहे. सध्याचा पिंपळ आजूबाजूच्या परिसरापेक्षा ३० फूट उंच ओट्यावर आहे. [[इ.स. १८११]] मध्ये बोधिवृक्ष पूर्ण चैतन्याने बहरलेला होता. जेव्हा तो
[[फ्रान्सिस बुकॅनन-हॅमिल्टन|डॉ बुकॅनन (हॅमिल्टन)]] यांनी पाहिला तेव्हा त्यांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले आहे की, त्याचे वय १०० वर्षापेक्षा जास्त नसावे.<ref>[https://archive.org/details/cu31924008747788 Archaeological Survey of India], Volume 1, Four Reports Made During the Years 1862-63-64-66</ref></blockquote>
 
तथापि, पुढे तो वृक्ष कुजला आणि [[इ.स. १८७६]] मध्ये वादळात नष्ट झाला. [[इ.स. १८८१]] मध्ये बकिंगहॅम (Cunningham) यांनी त्याच जागेवर पुन्हा नवीन बोधिवृक्ष लावला.<ref name="buddhanet.net">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.buddhanet.net/e-learning/dharmadata/fdd23.htm |शीर्षक=Buddhist Studies: Bodhi Tree |publisher=Buddhanet.net |date= |accessdate=2013-08-01}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=http://archive.org/details/cu31924008747788|शीर्षक=Mahâbodhi, or the great Buddhist temple under the Bodhi tree at Buddha-Gaya|last=Cunningham|first=Alexander|date=1892|publisher=London, W. H. Allen|others=Cornell University Library}}</ref> अलेक्झांडर बकिंगहॅम [[इ.स. १८९२]] मध्ये म्हणतात. “मी इ.स.१८७१ मध्ये आणि इ.स. १८७५ मध्ये बोधिवृक्ष पाहिला. तो पूर्णतः कुजलेला होता. नंतर अल्पावधीतच मी इ.स. १८७६ मध्ये बोधिवृक्ष पाहिला तर त्याचा काही भाग वादळामुळे पश्चिमेकडील भिंतीवर पडलेला होता आणि जुना पिंपळ नष्ट झालेला होता. तथापि, बोधिवृक्षाच्या मूळ जुन्या झाडाच्या अनेक बिया जमा होऊन त्यांपासून झालेल्या नवीन रोपट्यांनी पुन्हा ती जागा घेतली होती.”
 
=== बोधगया ===
[[Fileचित्र:A small temple beneath the Bodhi tree, Bodh Gaya, c. 1810.jpg|leftडावे|thumbइवलेसे|इ.स. १८१० बोधिवृक्षाखालील छोटेसे विहार.]]<nowiki> </nowiki><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/addorimss/a/019addor0003269u00000000.html|शीर्षक=A small Hindu temple beneath a banyan tree, Bodhgaya|last=Wright|first=Colin|website=www.bl.uk|language=en|access-date=2018-05-12}}</ref>
[[Fileचित्र:Maha Bodhi tree 2.jpg|thumbइवलेसे|बोधगया येथील सध्याचा महाबोधिवृक्ष ]]
 
== पुस्तके ==
‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’ नामक मराठी पुस्तक [[हेमा साने]]ंनी लिहिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामधील साधेपणा, स्पष्टता व सर्वव्यापीपणा हा जगात औत्सुक्य आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेक अंगांनी त्याचा वेध घेतला जात आहे. हे पुस्तक बुद्धचरित्र व परंपरांचा वेध घेत बोधिवृक्षाचा बुद्धाच्या आयुष्याशी संबंध व संदर्भ जोडते.
 
दुसऱ्या भागात सिद्धार्थ गौतमपूर्वीची बुद्धांची परंपरा, त्या प्रत्येक बुद्धांचा ज्ञानवृक्ष यांची माहिती आहे. तन्हकर बुद्धाचा बोधिवृक्ष सप्तपर्णी, मेधंकर आणि पळस, सरणंकरचा पाटला आणि पाडल वृक्ष, दीपंकर आणि पिम्पर्णी, कौंडण्यचा मोई, मंगल, सुमन, रेवत, शोभित आणि नागचाफा अशा बुद्धांशी संबंधित विविध वृक्षांची माहिती यात दिली आहे. सिद्धार्थ गौतमाशी संबंधित [[जांभूळ]], पिंपळ, अशोक, [[कदंब]] या झाडांची ओळखही लेखिकेने करून दिली आहे.
 
== चित्रदालन ==
<gallery>
File:Maha bodhi temple.jpg|thumb|[[बिहार]] मधील [[महाबोधी विहार]].
</gallery>
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Bodhi Tree|बोधिवृक्ष}}
 
२७,९३७

संपादने